Exit Poll : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, पहा एक्झिट पोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा २०२४ निवडणुकीची ‘सेमीफायनल’ मानले गेलेल्‍या पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राजस्‍थान आणि छत्तीसगडमध्‍ये सत्ता टिकवण्‍याचे काँग्रेससमोर आव्‍हान आहे. तर मध्‍य प्रदेशमध्‍ये सत्ता कायम ठेवण्‍यासाठी भाजप प्रयत्‍नशील आहे. तेलंगणामध्‍ये बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल … The post Exit Poll : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, पहा एक्झिट पोल appeared first on पुढारी.
#image_title

Exit Poll : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, पहा एक्झिट पोल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा २०२४ निवडणुकीची ‘सेमीफायनल’ मानले गेलेल्‍या पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राजस्‍थान आणि छत्तीसगडमध्‍ये सत्ता टिकवण्‍याचे काँग्रेससमोर आव्‍हान आहे. तर मध्‍य प्रदेशमध्‍ये सत्ता कायम ठेवण्‍यासाठी भाजप प्रयत्‍नशील आहे. तेलंगणामध्‍ये बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (MNF) विरुद्ध काँग्रेसच्या लढतीला यंदा झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचेही आव्‍हान आहे. दरम्‍यान, आज ( दि. ३० ) तेलंगणा राज्‍यात मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर सायंकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार, मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस असा अंदाज बहुतांश एक्‍झिट पोलने (Exit Poll Results 2023) व्‍यक्‍त केला आहे. वास्‍तविक पाचही राज्‍यातील अधिकृत निकाल ३ डिसेंबर राेजी जाहीर हाेणार आहे. मतदान केंद्रातून बाहेर पडल्‍यानंतर तत्‍काळ मतदारांकडून घेतलेल्‍या माहितीच्‍या आधारे एक्‍झिट पोलचा अंदाज वर्तविला जातो. जाणून घेवूया पाच राज्‍यातील Exit polls मधील माहिती…
Exit Poll Results 2023 : मध्यप्रदेशमध्‍ये भाजप मारणार बाजी
मध्‍य प्रदेश विधानसभेच्‍या २३० जागांवर यंदा काँग्रेस आणि भाजपने स्‍वबळावर निवडणूक लढवली आहे. Jan ki Baat एक्‍झिट पोलनुसार राज्‍यात राज्‍यात भाजपला १०० ते १२३, काँग्रेसला १०२-१२५, इतर ५ जागांपर्यंत मजल मारण्‍याची शक्‍यता आहे.
Republic Exit Poll 
BJP: 118-130
Congress: 97-107
Others: 0-2
Jan ki Baat Exit Poll :
BJP: 100-123 seats
Congress: 102-125 seats
Others: 5
Exit Poll Results 2023 : राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी…
राजस्‍थान विधानसभेच्‍या २०० जागांपैकी १९९ मतदारसंघात निवडणूक झाली आहे. यंदा काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत आहे. Jan Ki Baat एक्‍झिट पोलनुसार राज्‍यात भाजप १००-१२२ तर काँग्रेस ६२-८५ जागांपर्यंत मजल मारण्‍याची शक्‍यता आहे.
Exit Poll Results 2023 : छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस
छत्तीसगड विधानसभेच्‍या ९० जागांसाठी ७ नोव्‍हेंबर आणि १७ नोव्‍हेंबर २०२३ रोजी मतदान झाले होते. आता Jan ki Baat च्या एक्‍झिट पोलनुसार, राज्‍यात भाजपला ३४ ते ४५, काँग्रेसला ४२-५३ जागांपर्यंत मजल मारण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात आला आहे.
हेही वाचा :

Telangana Assembly Election : तेलंगणामध्‍ये ‘केसीआर’ यांना आव्‍हान देणारे रेवंत रेड्डी आहेत तरी कोण?
Madhya Pradesh Assembly Elections : 34 जागांवर महिलांचे मतदान पुरुषांहूनही अधिक!
Rajasthan Assembly Elections : ध्रुवीकरण, तुष्टीकरणाचा फंडा कायम
Chhattisgarh Assembly Election 2023 | छत्तीसगडमध्ये काँग्रेस-भाजप काट्याची लढत

The post Exit Poll : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, पहा एक्झिट पोल appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा २०२४ निवडणुकीची ‘सेमीफायनल’ मानले गेलेल्‍या पाच राज्‍यांमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली आहे. राजस्‍थान आणि छत्तीसगडमध्‍ये सत्ता टिकवण्‍याचे काँग्रेससमोर आव्‍हान आहे. तर मध्‍य प्रदेशमध्‍ये सत्ता कायम ठेवण्‍यासाठी भाजप प्रयत्‍नशील आहे. तेलंगणामध्‍ये बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांची हॅटट्रिक रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल …

The post Exit Poll : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपची मुसंडी तर छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेस, पहा एक्झिट पोल appeared first on पुढारी.

Go to Source