अबोली मालिका : सुयश टिळकच्या विविधांगी भूमिकांचे होतेय कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचं सध्या कौतुक होतंय. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत. कधी तो कडकलक्ष्मीच्या रुपात समोर येतो, तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी तो रिक्षाचालक असतो तर कधी विदुषक. संबंधित बातम्या – London Misal movie : ”लंडन मिसळ” … The post अबोली मालिका : सुयश टिळकच्या विविधांगी भूमिकांचे होतेय कौतुक appeared first on पुढारी.
#image_title

अबोली मालिका : सुयश टिळकच्या विविधांगी भूमिकांचे होतेय कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचं सध्या कौतुक होतंय. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत. कधी तो कडकलक्ष्मीच्या रुपात समोर येतो, तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी तो रिक्षाचालक असतो तर कधी विदुषक.
संबंधित बातम्या –

London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित

Koffee With Karan – 8 : शाहरुख-आमिरला नाही म्हटल्याचा काजोलला अजूनही पश्चाताप?

Animal Advance Booking : ‘ॲनिमल’ चं जबरदस्त बुकिंग; ‘सॅम बहादुर’, ‘जेलर’ ला टाकलं मागे

कधी तो दशावतारी रावण असतो तर कधी पोस्टमन. सुयशने मालिकेत परिचारिका, लमाणी स्त्री, जादुगार अशी वेगवेगळी पात्र देखिल साकारली आहेत. थोडक्यात सांगायचं तर भूमिका एक आणि त्याच्या छटा अनेक. मराठी मालिका विश्वात हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय.

अबोली मालिकेतल्या या बहुरुपी पात्राविषयी सांगताना सुयश म्हणाला, ‘ही भूमिका साकारताना मी खऱ्या अर्थाने समृद्ध होतोय. एकाच मालिकेत मी आतापर्यंत १५ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येक पात्र वेगळं आहे. ते समजून घेत त्याप्रमाणे व्यक्त होणं ही वेगळी कसोटी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रत्येक पात्रासाठी तयार होताना मी आणि अबोली मालिकेची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतेय. आमचे मेकअपमन शैलेश पाठारे आणि त्यांची संपूर्ण टीम माझ्या लूकवर विशेष मेहनत घेतात. त्यामुळेच मी साकारलेलं प्रत्येक पात्र वेगळं दिसतं. अबोली मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे आणि यापुढेही मिळत राहील याची खात्री आहे.’
The post अबोली मालिका : सुयश टिळकच्या विविधांगी भूमिकांचे होतेय कौतुक appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या अबोली मालिकेत सुयश टिळक साकारत असलेल्या भूमिकेचं सध्या कौतुक होतंय. मालिकेत त्याने आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल १५ वेगवेगळी पात्र साकारली आहेत. कधी तो कडकलक्ष्मीच्या रुपात समोर येतो, तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी तो रिक्षाचालक असतो तर कधी विदुषक. संबंधित बातम्या – London Misal movie : ”लंडन मिसळ” …

The post अबोली मालिका : सुयश टिळकच्या विविधांगी भूमिकांचे होतेय कौतुक appeared first on पुढारी.

Go to Source