कोल्हापूर : अवैद्य गौण खनिज वाहतुकीवर कारवाईचा धडाका

कासारवाडी; पुढारी वृत्तसेवा : परिसरात होणाऱ्या अवैद्य गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामध्ये विनापरवाना दगड, मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरवर खणीकर्म अधिकारी व महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. वीकेंडला अवैध वाहतूक जोर कासारवाडीसह परिसरात अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक ही मोठी समस्या गेल्या अनेक दिवसांपासून आहे. याबाबत अनेक वेळा महसूल, …

कोल्हापूर : अवैद्य गौण खनिज वाहतुकीवर कारवाईचा धडाका

कासारवाडी; Bharat Live News Media वृत्तसेवा : परिसरात होणाऱ्या अवैद्य गौण खनिज वाहतुकीवर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामध्ये विनापरवाना दगड, मुरूम वाहतूक करणाऱ्या डंपरवर खणीकर्म अधिकारी व महसूल प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
वीकेंडला अवैध वाहतूक जोर
कासारवाडीसह परिसरात अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक ही मोठी समस्या गेल्या अनेक दिवसांपासून आहे. याबाबत अनेक वेळा महसूल, खनिकर्म तसेच मंत्रालयापर्यंत तक्रारी झाल्या आहेत तरीसुद्धा येथील अवैध गौण खनिज उत्खनन , मुरूम उत्खनन वाहतूकीला आळा बसलेला नाही. पम सध्या खनीज कर्म व महसूल विभागाने एकाच आठवड्यात दोन कारवाया करत झटका दिला आहे.
यावेळी शनिवारी मुरूम वाहतुक करणाऱ्या एम एच ०९ इ एम ८८२१ आणि एम एच ०९ इ एम ६२५३ या दोन डंपरवर स्वतः जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे दोन लाखापेक्षा अधिक दंड केला. तर आज (दि.12) सकाळी आठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गालगत टोपजवळ पुन्हा आनंद पाटील यांनी एम एच ०९ इ एम ६२६० डंपर थांबवून त्याच्याकडे वाहतूक पास बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे पास आढळून आला नाही. या डंपर मधून दोन ब्रास अनाधिकृत विनापरवाना दगड वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. यावर महसूल व खनिकर्म विभागाने सुमारे १ लाख १७ हजार रुपये दंड केला.
पाच वर्षांपूर्वीच्या कारवाईची आठवण
पाच वर्षांपूर्वी हातकणंगलेचे तत्कालीन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी भागात जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई करत अनेक डंपर व मोठ्या चीनच्या जेसीपी मशीन जप्त करत लाखो रुपयांचा दंड करुन शासनाला महसूल मिळवून दिला होता. याची आठवण नागरिकांना आज झाली.
कारवाईची बातमी समजताच इतर वाहने पसार
परिसरात अवैद्य गौण खनिज उत्खनन व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. बुधवारी सकाळी कारवाईची बातमी परिसरात समजताच या मार्गावरून येणारे इतर डंपर पसार झाले. काहींनी शेतात तर काहींनी आजूबाजूच्या जंगलात डंपर लपवल्याचे नागरिकांनी पाहिले.