डोंबिवली : महिला डॉक्टरचा लिफ्टमध्ये विनयभंग; फूड डिलिव्हरी बॉयला अटक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एका रूग्णाच्या उपचारासाठी गेलेल्या महिला डॉक्टरचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध फूड पार्सल कंपनीतील डिलिव्हरी बॉयने हा प्रकार केला. यावेळी महिला डॉक्टरने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र लिफ्ट उघडताच डिलिव्हरी बॉय पळून गेला. यशवंत धोत्रे असे पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव …

डोंबिवली : महिला डॉक्टरचा लिफ्टमध्ये विनयभंग; फूड डिलिव्हरी बॉयला अटक

डोंबिवली; Bharat Live News Media वृत्तसेवा : डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये एका रूग्णाच्या उपचारासाठी गेलेल्या महिला डॉक्टरचा लिफ्टमध्ये विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका प्रसिद्ध फूड पार्सल कंपनीतील डिलिव्हरी बॉयने हा प्रकार केला. यावेळी महिला डॉक्टरने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र लिफ्ट उघडताच डिलिव्हरी बॉय पळून गेला. यशवंत धोत्रे असे पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव असून त्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील एका हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या वयोवृद्ध रूग्णावर फिजिओथेरपीचे उपचार सुरू आहेत. हे उपचार करण्यासाठी मागील काही दिवसांपासून एक महिला डॉक्टर सदर वृद्धाच्या घरी जातात. दोन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महिला डॉक्टर सोसायटीतून खाली येण्यासाठी लिफ्टमध्ये गेल्या. सहावा मजल्यावर लिफ्टचे दार उघडले. यावेळी फूड डिलिव्हरी बॉय दारासमोर उभा होता. त्याने लिफ्टमध्ये प्रवेश केला. लिफ्टमध्ये महिला एकटीच आल्याचे पाहून डिलिव्हरी बॉय पिसाळला. लिफ्टचे दार बंद होताच त्याने महिला डॉक्टरशी अंगलगट करून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरने त्याला कडाडून प्रतिकार केला. तिने तात्काळ ग्राऊंड फ्लोअरचे बटन दाबले. लिफ्टचे दार उघडताच डिलिव्हरी बॉयने पळून जाण्याचा प्रयत्न केला. महिला डॉक्टरने कॉलर पकडून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताला जोराचा झटका देऊन डिलिव्हरी बॉयने पळ काढला. तो पळून गेल्यानंतर महिला डॉक्टरने सहाव्या मजल्यावर प्रत्येक घरात जाऊन झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी कुणाकडे आला होता, याबाबत चौकशी केली. एका रहिवाशाकडून समर्पक उत्तर मिळाल्यानंतर महिला डॉक्टराने मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःवर बेतलेला प्रसंग पोलिसांना सांगितला.
पसार झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलिस पथके तातडीने त्याच्या मागावर सोडण्यात आली. अवघ्या काही तासांतच डिलिव्हरी बॉय यशवंत धोत्रे याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.