Nagar : सरकारी कर्मचारी 14 पासून संपावर
नगर : पुढारी वृत्तसेवा : सहा महिने उलटूनदेखील राज्य सरकारने आश्वासनाची पूर्तता केलेली नसल्याने राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटेच्या अहमदनगर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाला दिली आहे.
मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी जुनी पेन्शन व इतर 17 मागण्यांबाबत बेमुदत संप पुकारला होता. हा संप स्थगित करताना मुख्यमंत्र्यांनी संघटनेशी चर्चा करून लेखी आश्वासन दिले होते.
संबंधित बातम्या :
पुणेकरांनो, जरा जपून; धरणात चक्क सांडपाणी!
धक्कादायक ! चेन्नईहुन पुणे येणाऱ्या भारत गौरव रेल्वेमधील 40 प्रवाशांना विषबाधा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर
शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा म्हणून मागील संप स्थगित करण्यात आला. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस शासनाला दिली असून, याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या वेळी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे आप्पासाहेब शिंदे, विजय काकडे, पी. डी. कोळपकर, पुरुषोत्तम आडेप, बी. एम. नवगन, अशोक नरसाळे, मुकुंद शिंदे, बी.डी. कोठुळे, गणेश कवडे आदी उपस्थित होते.
The post Nagar : सरकारी कर्मचारी 14 पासून संपावर appeared first on पुढारी.
नगर : पुढारी वृत्तसेवा : सहा महिने उलटूनदेखील राज्य सरकारने आश्वासनाची पूर्तता केलेली नसल्याने राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुन्हा संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबरपासून बेमुदत संपाची नोटीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटेच्या अहमदनगर शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाला दिली आहे. मार्च 2023 मध्ये सरकारी कर्मचारी, शिक्षकांनी जुनी पेन्शन व इतर …
The post Nagar : सरकारी कर्मचारी 14 पासून संपावर appeared first on पुढारी.