गोंदिया : गो-तस्करांना सालेकसा पोलिसांचा दणका

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया येथे कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गोवंश जनावारांच्या तस्करांवर साकेलसा जिल्हा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकुण 22 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या जनावारांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बुराडे यांनी आपल्या पथकासह (दि.11) रात्री 12.30 ते 3 वाजताच्या सुमारास पानगाव …

गोंदिया : गो-तस्करांना सालेकसा पोलिसांचा दणका

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : गोंदिया येथे कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या गोवंश जनावारांच्या तस्करांवर साकेलसा जिल्हा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एकुण 22 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान या जनावारांची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बुराडे यांनी आपल्या पथकासह (दि.11) रात्री 12.30 ते 3 वाजताच्या सुमारास पानगाव जंगल परिसरात पोलिसांनी धाड टाकली. सदर कारवाईमध्ये तस्करीसाठी वापरेल्या वाहनात कोणत्याही चारापाण्याची सोय केली नव्हती. या वाहनात एकुण 22 जनावरे कोंबून भरलेली होती. दरम्यान वाहनातील जनावरे आणि वाहन अशी एकुण 6.3 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. शाहबाज नुर हुसेन खान (वय.52 रा. रीसेवाडा, बालाघाट), अंगरथ राजेंद्र मोहबे (वय 29 रा. चिचटोला, गोंदिया) असे आरोपींचे नाव आहे.
वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुषण बुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, पोलीस उपनिरिक्षक अजय पाटील, पोलीस शिपाई राहुल रोकडे, जितेन्द्र पगरवार, विजेन्द्र चुलपार, चालक पोलीस नायक राधेश्याम रहांगडाले यांनी पार पाडली.
हेही वाचा :

डोंबिवलीतील इंडो अमाईन्स कंपनीला आग; कंपन्यांचे मोठे नुकसान
Kuwait Fire : कुवेतमध्ये अग्नितांडव! 10 भारतीयांसह 41 जणांचा होरपळून मृत्यू
तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’मध्ये बोल्ड अंदाज, लाल साडीत समुद्रकिनारी…