नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या यात्रेची संकल्पना मांडली आहे. ही यात्रा आता गावात येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
संबंधित बातम्या
हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी सुरक्षित उभी करून सोडले प्राण
अटक झाल्यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपद सोडावे का? आप जाणून घेणार ‘जनमत’! ‘
अधिकार्यांचा अधिवेशनात पर्दाफाश करू : आमदार प्राजक्त तनपुरे
केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे आयोजित कार्यक्रमात नागपूर जिल्ह्याच्या यात्रेचा शुभारंभ झाला. देशभरात विविध राज्यांमधील अनेक शहरांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.
आमदार समीर मेघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, भाजप नेते अरविंद गजभिये, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. नितिन गडकरी यांनी देशातील १५ हजार स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना शेतात द्रोणचा वापर करण्याचे व द्रोणच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
The post ‘विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन’ appeared first on पुढारी.
नागपूर : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताच्या यात्रेची संकल्पना मांडली आहे. ही यात्रा आता गावात येऊन पोहोचली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. संबंधित बातम्या हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी …
The post ‘विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन’ appeared first on पुढारी.