पीएम मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे शिक्षण, संपत्ती किती? जाणून घ्या

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील ८० टक्के केंद्रीय मंत्री हे पदवीधारक असून ९८ टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जारी केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. Modi Cabinet Modi Cabinet : मंत्र्यांचे शिक्षण, संपत्ती किती? जाणून घ्या ८० टक्के केंद्रीय मंत्री हे …

पीएम मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे शिक्षण, संपत्ती किती? जाणून घ्या

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील ८० टक्के केंद्रीय मंत्री हे पदवीधारक असून ९८ टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने जारी केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. Modi Cabinet
Modi Cabinet : मंत्र्यांचे शिक्षण, संपत्ती किती? जाणून घ्या

८० टक्के केंद्रीय मंत्री हे पदवीधारक
९८ टक्क्यांपेक्षा जास्त मंत्र्यांकडे कोट्यवधींची मालमत्ता
११ मंत्र्यांचे केवळ बारावीपर्यंत शिक्षण
३ मंत्री हे पदविकाधारक

 
या अहवालानुसार, ११ मंत्र्यांनी केवळ बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ३ मंत्री हे पदविकाधारक आहेत. २८ मंत्र्यांविरोधात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यातील १९ जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिलांवरील गुन्हे आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तब्बल ७० मंत्र्यांकडे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यातील ६ जणांची संपत्ती १०० कोटींपेक्षाही जास्त आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांच्याकडे सर्वात कमी ३० लाखांची संपत्ती असल्याचे अहवालात नमूद आहे.
Modi Cabinet : लोकसभेच्या इतिहासात गुन्हे दाखल असलेले सर्वाधिक खासदार
१८ व्या लोकसभेतील ५४३ खासदारांपैकी २५१ अर्थात ४६ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. आजवरच्या इतिहासात ही संख्या यंदा सर्वाधिक आहे. त्यापैकी १७० जणांवर बलात्कार, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २७ खासदारांना वेगवेगळ्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. . त्यामध्ये भाजप – ६३, काँग्रेस- ३२, समाजवादी पक्ष – १७, काँग्रेस – ७, द्रमूक – ६, तेलगू देसम – ५ आणि शिवसेनेच्या ४ खासदारांचा समावेश आहे. यापूर्वी २०१९ मध्ये २३३ खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल होते.
हेही वाचा 

आता मोदी सरकार नाही तर एनडीए सरकार आलंय : उद्धव ठाकरे
प्रियांका वाराणसीतून लढल्या असत्या तर मोदी पराभूत झाले असते
पीएम मोदी संविधान बदलतील, या निव्वळ अफवा : रामदास आठवले