Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे स्त्रीचा हात असतो पण जेव्हा एक नाही चक्क सहा बायका असतील तर त्या पुरुषाची हालत काय असेल, हे येत्या १२ जुलैला ‘बाई गं’ या चित्रपटातून कळणार आहे. आज चित्रपटाची एक छोटीशी झलक “जंतर मंतर” या पहिल्या गाण्यातून पाहायला मिळालीय.
अधिक वाचा –
तापसी पन्नूची छोटी बहिण तिच्यापेक्षाही हॉट, फोटो पाहाच!
अभिनेता स्वप्नील जोशी या गाण्यात वेगवेगळ्या वयोगटातील हरहुन्नरी सहा अभिनेत्रींसोबत आपला जलवा दाखवताना दिसतोय. सुकन्या मोने, प्रार्थना बेहेरे, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान यांनी जंतर मंतर या गाण्यावर चांगलीच जुगलबंदी रंगवली आहे. मितवा नंतर स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांची जोडी ‘बाई गं’ या चित्रपटात दिसणार आहे.
अधिक वाचा –
तापसी पन्नूचा ‘हसीन दिलरुबा’मध्ये बोल्ड अंदाज, लाल साडीत समुद्रकिनारी…
अवधूत गुप्ते, कविता राम, मुघदा कऱ्हाडे, शरायू दाते, श्वेता दांडेकर, सुसमिराता दावलकर, संचिता मोरजकर यांनी “जंतर मंतर” या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर वरून लिखाते यांचं संगीत आहे. गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिले आहेत. “जंतर मंतर” हे गाणं आपल्याला एवरेस्ट एंटरटेनमेंटवर पाहायला मिळेल.
अधिक वाचा –
वैदेही परशुरामी हिचा ‘एक दोन तीन चार’, धमाल उडवणार हे कलाकार
या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कुष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांचे आहेत. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत हे गाणं आहे.
View this post on Instagram
A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)