अकोला: जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस
अकोला: Bharat Live News Media वृत्तसेवा : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात दि. 11 ते 16 जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, असा अंदाज आहे.
नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.
हेही वाचा
अकोला: पेट्रोलपंप व्यावसायिकावर चाकू हल्ला करुन ३ लाख लांबविले
Lok sabha Election 2024 Results : अकोला: भाजपचे अनुप धोत्रे विजयी; अभय पाटील, प्रकाश आंबेडकरांचा पराभव
अकोला: आरटीई प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ