जसप्रीत बुमराहची ICC क्रमवारीत मोठी झेप! टॉप 10 मध्ये जबरदस्त बदल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : आयसीसीने नुकतीच टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. टॉप 10 मध्ये अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडूंनी आपले मानांकन आणि क्रमवारी वाढवली असून काहींना तोटाही सहन करावा लागला आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहने यावेळी क्रमवारीत मोठी …

जसप्रीत बुमराहची ICC क्रमवारीत मोठी झेप! टॉप 10 मध्ये जबरदस्त बदल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : आयसीसीने नुकतीच टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. टॉप 10 मध्ये अनेक मोठे आणि महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडूंनी आपले मानांकन आणि क्रमवारी वाढवली असून काहींना तोटाही सहन करावा लागला आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहने यावेळी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
आदिल रशीद टी-20 चा नंबर वन गोलंदाज
आयसीसीनुसार, सध्या टी-20 मधील नंबर वन गोलंदाज इंग्लंडचा आदिल रशीद आहे. त्याच्याचे खात्यात 707 रेटिंग आहे. तर श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा (676) दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा राशिद खान आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने एकाचवेळी तीन स्थानांनी झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग 671 आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एनरिक नॉर्खियानेही चार स्थानांनी झेप घेतली आहे. तो 662 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.
टॉप 10 यादीतील गोलंदाज
अफगाणिस्तानच्या फजल हक फारुकीला एकाचवेळी 6 स्थानांचा फायदा झाला आहे. तो 662 च्या रेटिंगसह 4 व्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडला थोडासा फटका बसला आहे. त्यांची एका जागेने घसरण झाली आहे. हेझलवूडचे रेटिंग 658 असून तो सहाव्या क्रमांकावर आहे. भारताच्या अक्षर पटेललाही फटका बसला आहे. तो चार स्थानांनी घसरून 7व्या क्रमांकावर आला आहे. त्याचे रेटिंग 654 आहे. वेस्ट इंडिजचा अकिल हुसेनही एका स्थानाने प्रगती करत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा महेक्षा तिक्षाना आणि भारताचा रवी बिश्नोई अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
जसप्रीत बुमराहची 42 स्थानांची झेप
जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या जसप्रीत बुमराह टॉप 10 काय टॉप 50 मध्ये सुद्धा नाही. पण यावेळी त्याने नक्कीच मोठी झेप घेतली आहे. त्याने 42 स्थानांनी प्रगती करत येत 69 वे स्थान मिळवले आहे. त्याचे रेटिंग 448 झाले आहे. मोहम्मद सिराजनेही 19 स्थानांची झेप घेतली आहे. त्याचे रेटिंग 449 असून तो 68 व्या स्थानावर आहे. टी-20 विश्वचषकाच्या आगामी सामन्यांमध्ये दोघांची कामगिरी अशीच राहिली तर लवकरच ते टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित करू शकतात.