Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (दि.11) भारत आणि कतार यांच्या पात्रता फेरीतील सामना झाला. सामन्यात कतारने भारताचा 2-1 पराभव करून सामन्यात विजय मिळवला; परंतु, सामन्याच्या कतारने नोंदवलेला गाेल अवैद्य असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) केली आहे.
काय आहे नक्की प्रकरण?
भारत आणि कतार सामन्यात फुटबॉल ‘आऊट ऑफ प्ले’ असतानाही कतारच्या खेळाडूंनी तो गोलपोस्टपर्यंत नेला. म्हणजे चेंडू गोलपोस्टच्या शेजारी नेमलेल्या रेषेच्या बाहेर गेला होता. मात्र, खेळ थांबवण्याऐवजी कतारच्या खेळाडूने बाहेर गेलेला बॉलचा पास दिला. आणि गोल नोंदवला गेला. भारतीय संघाच्या मागणीला न जुमानता रेफ्री किम वू सुंग यांनी गोल मंजूर केला. 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी प्रथमच FIFA विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत भारताला स्थान नाकारल्यामुळे या चुकीच्या गोलमुळे बराच वाद झाला.
‘एआयएफएफ’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आम्ही सामना आयुक्तांकडे तक्रार केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.’ इराणचा हामेद मोमेनी या सामन्याचा सामना आयुक्त होता. सामन्याचे निरीक्षण करणे आणि सामन्यादरम्यान फिफा नियमांचे पालन केले जाईल याची खात्री करणे ही सामना आयुक्तांची भूमिका आहे. आता यावर पंच काय निर्णय घेतात हे पाहायचे आहे.
𝗣𝗥𝗘𝗦𝗜𝗗𝗘𝗡𝗧’𝗦 𝗦𝗧𝗔𝗧𝗘𝗠𝗘𝗡𝗧 🔴#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/E5nxohuab2
— Indian Football Team (@IndianFootball) June 12, 2024
सामन्यात काय झालं?
सामन्याच्या 73 व्या मिनिटाला अब्दुल्ला अलहरकच्या फ्री किकवर युसेफ आयमेनने हेडरचा प्रयत्न केला, तो भारतीय कर्णधार आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने रोखला. त्यानंतर गुरप्रीत मैदानावर पडला आणि यादरम्यान चेंडू मैदानाबाहेर गेला. कतारच्या हाश्मी हुसेनने बाहेर गेलेल्या बॉलचा अवैद्यारित्या पास देत दिला. यावर कतारच्या खेळाडूने गोल नोंदवला. नियमांनुसार, बॉल खेळाच्या मैदानाबाहेर गेल्याने खेळ थांबवायला हवा होता आणि कतारला कॉर्नर किक द्यायला हवी होती. कारण बॉल मैदाना बाहेर जाण्यापूर्वी भारताचा कर्णधार गोलकीपर गुरप्रीत आणि बॉलचा संपर्क झाला होता.
परंतु, रेफ्रींनी असे न करता कतारला गोल दिल्याने भारतीय खेळाडूंची निराशा झाली. भारतीय संघाने मागणी करूनही रेफ्री आपल्या निर्णयावर ठाम राहिले. नियमांनुसार, जर चेंडू गोलरेषा किंवा टचलाइनमधून पूर्णपणे जमिनीवर किंवा हवेत निघून गेला, तर तो खेळबाह्य समजला जातो. भारताचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी नंतर निराशा व्यक्त करताना म्हटले की, या गोलमुळे त्यांच्या संघाचे स्वप्न संपुष्टात आले. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार गुरप्रीतनेही याला दुर्दैवी निकाल म्हटले आहे.
‘आमच्यावर अन्याय झाला’
भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमाक यांनी सांगितले की, कतारविरुद्धच्या सामन्यात आमच्यावर अन्याय झाला. त्यामुळे 85व्या मिनिटाला कतारने केलेल्या दुसऱ्या गोलमुळे भारतीय संघाचे विश्वचषक पात्रता फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले.
Tough loss for the Blue Tigers. 💔#QATIND #FIFAWorldCup 🏆 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/Fl6oxH5xj4
— Indian Football Team (@IndianFootball) June 11, 2024