17 व्या चेंडूवर पहिली धाव! नामिबियाच्या इरास्मसचा लाजिरवाणा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत नामिबियाच्या जेराल्ड इरास्मसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. नामिबियन कर्णधाराने आपल्या संघासाठी सर्वाधिक 43 चेंडूत 36 धावा केल्या. पण यादरम्यान त्याला त्याच्या पहिल्या धावेसाठी 17 चेंडू खेळून काढावे लागले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खाते उघडण्यासाठी सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम आता …

17 व्या चेंडूवर पहिली धाव! नामिबियाच्या इरास्मसचा लाजिरवाणा विक्रम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत नामिबियाच्या जेराल्ड इरास्मसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला. नामिबियन कर्णधाराने आपल्या संघासाठी सर्वाधिक 43 चेंडूत 36 धावा केल्या. पण यादरम्यान त्याला त्याच्या पहिल्या धावेसाठी 17 चेंडू खेळून काढावे लागले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खाते उघडण्यासाठी सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम आता इरास्मसच्या नावावर नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम केनियाच्या तन्मय मिश्राच्या नावावर होता. 2007 मध्ये तन्मय मिश्राने पाकिस्तानविरुद्ध 16 चेंडूत खाते उघडले होते.
ऑस्ट्रेलियाने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत तिसरा विजय नोंदवन ब गटातून सुपर-8 चे तिकीट निश्चित केले आहे. तर नामिबिया आणि ओमान बाहेर पडले आहेत. या गटातून स्कॉटलंड किंवा इंग्लंड सुपर-8 मध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
नामिबियाचा संघ 17 षटकांत अवघ्या 72 धावांत सर्वबाद झाला. जेराल्ड इरास्मसने 43 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या. मायकेल व्हॅन लिंगेनने 10 धावा केल्या, या दोघांशिवाय नामिबियाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. इरास्मसच्या खेळीच्या जोरावरच नामिबियाला ही धावसंख्या गाठता आली. 21 धावांत नामिबियाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झाम्पाने चार षटकात 12 धावा देत चार बळी घेतले. तर जोश हेझलवूड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पॅट कमिन्स आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 5.4 षटकात एक विकेटच्या मोबदल्यात 74 धावा करत सामना जिंकला. डेव्हिड वॉर्नरने 8 चेंडूत 20 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड 34 आणि मिचेल मार्श 18 धावा करून नाबाद परतले. कांगारू संघाला यापुढील सामना स्कॉटलंडविरुद्ध आहे. जो त्यांचा शेवटचा साखळी सामना आहे.