हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी सुरक्षित उभी करून सोडले प्राण
हिंगोली – पुढारी वृत्तसेवा : बसफेरीदरम्यान चालकाला हृदयविकाराचा झटका आला. परंतु, स्वत:ला सावरत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे प्राण वाचले. मारोती हनुमंत नेमाणे (वय ५४, रा. संतूक पिंपरी) असे चालकाचे नाव आहे.
संबंधित बातम्या –
पारनेर सैनिक बँक चेक अपहार प्रकरण ; सर्व संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदविणार
अधिकार्यांचा अधिवेशनात पर्दाफाश करू : आमदार प्राजक्त तनपुरे
Nagar : अरुण मुंढेंविरुद्ध मुरूम उत्खननाचा गुन्हा नोंदवा
हिंगोली आगाराचे चालक मारोती नेमाणे आणि वाहक रेखा चांदणे हे सकाळी ६ वाजता एम. एच. ०६ एस ८८०३ या मानव विकासच्या बसद्वारे हिंगोली ते धानोरा फेरीसाठी गेले होते. यादरम्यान शालेय विद्यार्थिनींना घेऊन त्यांनी शाळेत पोहोचविले. त्यानंतर धानोराहून ते हिंगोलीकडे निघाले. यादरम्यान बसमध्ये १५ ते २० प्रवासी बसले होते. ही बस सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ आली असता चालक मारोती नेमाणे यांना अचानक छातीत त्रास सुरू झाला. परंतु, स्वत:ला सावरत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केली. त्यानंतर त्यांनी बसच्या स्टेअरिंगवरच डोके ठेवले. यावेळी वाहक रेखा चांदणे यांनी प्रवाशांच्या मदतीने चालक नेमाणे यांना तात्काळ हिंगोली येथील एका खासगी रूग्णालयात आणले. परंतु, या ठिकाणी डॉक्टरांनी मारोती नेमाणे यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती कळताच हिंगोली आगार प्रमुख सूर्यकांत थोरबोले, वाहतूक निरीक्षक एफ.एम.शेख यांनी रूग्णालयात धाव घेतली. चालक नेमाणे यांच्या पश्चात आई, पत्नी, चार मुली, दोन मुले असा परिवार आहे. नेमाणे यांच्या मृत्यूने बस आगारातील कर्मचार्यांसह संतूक पिंपरी येथे शोककळा पसरली आहे.
The post हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी सुरक्षित उभी करून सोडले प्राण appeared first on पुढारी.
हिंगोली – पुढारी वृत्तसेवा : बसफेरीदरम्यान चालकाला हृदयविकाराचा झटका आला. परंतु, स्वत:ला सावरत बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी केल्यानंतर चालकाने प्राण सोडल्याची घटना सेनगाव ते हिंगोली मार्गावरील रिधोरा पाटीजवळ ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाच्या या समयसुचकतेमुळे १५ ते २० प्रवाशांचे प्राण वाचले. मारोती हनुमंत नेमाणे (वय ५४, रा. संतूक पिंपरी) असे …
The post हिंगोली : बस चालकाचा हृदयविकाराने मृत्यू, गाडी सुरक्षित उभी करून सोडले प्राण appeared first on पुढारी.