अटक झाल्‍यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपद सोडावे का? आप जाणून घेणार ‘जनमत’!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी भाजपने आम आदमी पार्टी विरुद्ध षड्यंत्र रचले आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्‍यास त्‍यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा की नाही? याबाबत आम आदमी  पार्टी जनतेचे मत जाणून घेणार आहे. यासाठी १ ते २० डिसेंबर या कालावधीत दिल्‍लीत स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे … The post अटक झाल्‍यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपद सोडावे का? आप जाणून घेणार ‘जनमत’! appeared first on पुढारी.
#image_title
अटक झाल्‍यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपद सोडावे का? आप जाणून घेणार ‘जनमत’!


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी भाजपने आम आदमी पार्टी विरुद्ध षड्यंत्र रचले आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्‍यास त्‍यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा की नाही? याबाबत आम आदमी  पार्टी जनतेचे मत जाणून घेणार आहे. यासाठी १ ते २० डिसेंबर या कालावधीत दिल्‍लीत स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे निमंत्रक गोपाल राय यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आपचे खासदार राघव चढ्ढा यांचीही उपस्‍थिती होती. ( AAP public opinion)
दिल्‍लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्याचा कट भाजपने रचला आहे, असा आरोप करत गोपाळ राय म्‍हणाले की, शुक्रवारपासून “मै भी केजरीवाल” मोहिमेअंतर्गत आपचे स्वयंसेवक शहरातील सर्व २,६०० मतदान केंद्रांवर लोकांच्या सह्या घेण्यासाठी पत्रिका घेऊन जातील. अटक झाल्‍यास केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे की नाही, यावर त्यांचे मत विचारले जाईल.”

STORY | AAP to seek public opinion from December 1 on whether Arvind Kejriwal should resign as CM if arrested
READ: https://t.co/TY6KEcBlJi
(PTI Photo) pic.twitter.com/9hg31qk45V
— Press Trust of India (@PTI_News) November 30, 2023

केजरीवाल यांनी आप आमदार आणि नगरसेवकांशी याबाबत मत मत जाणून घेतले होते. यावेळी सर्वांनी त्यांनी राजीनामा देऊ नये , यावर एकमत झाले आहे, असेही राय यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. ( AAP public opinion)
नोव्‍हेंबर महिन्‍याच्‍या प्रारंभीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. केजरीवाल यांनी ‘ईडी’समोर हजर राहणे टाळले. ही कारवाई “बेकायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित” असल्याचा दावाही केला होता. तसेच त्यांनी नोटीस मागे घेण्याची मागणी केली होती.
 
The post अटक झाल्‍यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपद सोडावे का? आप जाणून घेणार ‘जनमत’! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी भाजपने आम आदमी पार्टी विरुद्ध षड्यंत्र रचले आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्‍यास त्‍यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा की नाही? याबाबत आम आदमी  पार्टी जनतेचे मत जाणून घेणार आहे. यासाठी १ ते २० डिसेंबर या कालावधीत दिल्‍लीत स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे …

The post अटक झाल्‍यास केजरीवालांनी मुख्यमंत्रिपद सोडावे का? आप जाणून घेणार ‘जनमत’! appeared first on पुढारी.

Go to Source