विधानसभा स्वबळावर लढविण्याबाबत भाजपमध्ये चिंतन

मुंबई राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप करताना महायुतीत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याने भाजपमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्वबळावर ही निवडणूक लढविण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती झाल्या तर त्यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, असा सूर भाजपमध्ये वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पारचा नारा देणाऱ्या भाजपला …

विधानसभा स्वबळावर लढविण्याबाबत भाजपमध्ये चिंतन

नरेश कदम

मुंबई
राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांचे वाटप करताना महायुतीत झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा फटका बसल्याने भाजपमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्वबळावर ही निवडणूक लढविण्याबाबत चिंतन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती झाल्या तर त्यात भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, असा सूर भाजपमध्ये वर्तविला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात ४५ पारचा नारा देणाऱ्या भाजपला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या. त्यामुळे भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला विधानसभेच्या १५० हून अधिक मतदारसंघात मताधिक्य मिळाले आहे. तर महायुती १२८ विधानसभा मतदारसंघात पुढे आहे. महाआघाडीला मराठा, मुस्लिम आणि दलितांची मते मिळाली. ओबीसी मतांवर अवलंबून असलेल्या महायुतीला या मतांवर १७ जागाच जिंकता आल्या.
अधिक वाचा-

अजित पवारांना फोन केलाच नाही; नुतन खासदार सोनवणेंचा दावा

विधानसभेच्या २८८ जागांपैकी प्रत्येकी किमान ८० जागांची मागणी शिंदे गट आणि अजित पवार गट करणार आहे. त्यामुळे त्यांना किमान प्रत्येकी ७० जागा या दोन गटाला दिल्या तर भाजपच्या वाट्याला केवळ १४८ जागा येतात. त्यात १०० चा आकडा पार करणे कठीण आहे. त्यामुळे बहुरंगी लढती झाल्या तर विधानसभेचे चित्र काय असेल? तसेच महायुती विरुद्ध महाआघाडी अशी सरळ लढत झाली तर महाआघाडीचे पारडे जड होऊ शकते, असे भाजपला वाटते.
अधिक वाचा-

विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस-शिवसेनेत वाद

भाजपची चिंता
भाजपला साथ दिल्यामुळे अजित पवार गटाकडे दलित आणि मुस्लिम तसेच काही प्रमाणात मराठा मतदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे विधानसभेला ही मते पुन्हा आघाडीकडे जाऊ शकतात. अजित पवार स्वतंत्र लढले तर त्यांच्या हिमतीवर जास्त जागा जिंकू शकतात, असा भाजपचा अंदाज आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत गद्दार म्हणून आघाडी कडून प्रचार केला जाईल, त्याला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न सतावत आहे.
अधिक वाचा-

काँगेस प्रवक्त्यांचा इंडिया टीव्हीवरील चर्चेवर बहिष्कार

शिंदे-पवारांचा फारसा उपयोग नाही
मूळ शिवसेनेची मते शिंदे गटाला घेता आली नाहीत. त्यांचे जरी ७ खासदार निवडून आले असले तरी भाजप आमदाराच्या मताधिक्यामुळे त्यांचे खासदार निवडून आले, असा भाजपचा दावा आहे. अजित पवार यांचा फारसा फायदा भाजपला झालेला नाही. शिंदे आणि अजित पवार गटाची मते भाजपकडे गेली नाहीत. त्यामुळे शिंदे आणि अजित पवार सोबत येण्याचा लोकसभा निवडणुकीत फारसा उपयोग झाला नाही, असे भाजपचे मत बनले आहे.