Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गाझा युद्धविरामाला संयुक्त राष्ट्राने मंजुरी दिली. यानंतर नव्या शांततापर्वावर चर्चा सुरु झाली आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने युद्धविराम प्रस्तावर दुरुस्ती मागितली आहे. तर इस्रायलने हमासने सुचवलेल्या दुरुस्तीवर अंमलबजावणीस नकार दिला आहे. पुन्हा एकदा दोन्ही बाजूंमधील दोषारोपाचा खेळ सुरू झाला आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.
गाझामधून इस्रायली पूर्णपणे माघारीची मागणी
हमासने गाझामधील अमेरिकेने सादर केलेल्या युद्धविराम प्रस्तावाला आपला प्रतिसाद सादर केला आहे. तसेच या करारामध्ये दुरुस्ती सुचवली आहे. यामध्ये कायमस्वरूपी युद्धविराम आणि गाझामधून इस्रायली पूर्णपणे माघार घेण्याचा समावेश होता. ही मागणी यापूर्वीही इस्त्रायलने फेटाळरूी आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या समन्वयाने कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांद्वारे चर्चा सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
हमासचे प्रवक्ते आणि राजकीय ब्युरो सदस्य ओसामा हमदान यांनी लेबनॉनमधील टीव्ही चॅनेल ‘अल मायादीन’ला सांगितले की, आम्ही युद्धविराम साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. मात्र कायमस्वरुपी युद्धविराम आणि गाझामधून इस्त्रायलने पूर्णपणे माघार घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. दरम्यान, सीएनएनच्या बराक रविड यांच्याशी बोलताना एका इस्रायली अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्या बायडेन यांनी मांडलेला ओलिस सुटका कराराचा प्रस्ताव हमासने नाकारला असल्याचे इस्त्रायलच्या अधिकार्यांनी सांगितले.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन हे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सुचवलेल्या युद्धविराम काराराच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान, इस्रायलने तयार केलेला हा आराखडा पूर्णतः सार्वजनिक करण्यात आलेला नाही. सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने मान्यता दिली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांची मंजुरी
अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या युद्धविराम प्रस्तावात तीन-टप्प्यांवरील योजनेची मागणी करण्यात आली आहे. याचा प्रारंभ सर्वप्रथम सहा आठवड्यांच्या युद्धविरामाने होईल. पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात काही ओलीसांची सुटका करेल. इस्रायली सैनिक गाझातून माघार घेतील. तसेच पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शत्रुत्वाचा कायमचा अंत होईल, उरलेल्या सर्व ओलीसांची सुटका होईल आणि गाझामधून संपूर्ण इस्रायली माघार येईल. तिसरा टप्पा गाझासाठी एक प्रमुखपुनर्रचना योजना सुरू करण्यात येईल. करेल. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांनी मंजुरी दिली आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धविराम करारावर परस्परविरोधी संकेत दिले असून, इस्रायलने हा प्रस्ताव मान्य केल्याचे अमेरिकेने सांगूनही हमासचा नाश होईपर्यंत इस्रायल थांबणार नाही, असे म्हटले आहे.
हेही वाचा :
Israel Hamas War : इस्रायलने युद्ध थांबवल्यास हमास करार करण्यास तयार
इस्रायलचा रफाहवर हवाई हल्ला, ३५ पॅलेस्टिनींसह हमास कमांडर ठार
अमेरिकेने इस्त्रायलवर डोळे वटारले; नेत्याहून म्हणाले, “आमचे जवान…”