एका क्षणात ८ जणांच कुटुंब संपलं; उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका भीषण अपघातात ८ जणांच कुटुंब संपलं. वाळू वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झोपडीवर उलटला. यामध्ये झोपडीत झोपलेल्या कुटुंबातील ४ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी ट्रकचालक आणि हेल्परला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मल्लवान शहरातील उन्नाव रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये …

एका क्षणात ८ जणांच कुटुंब संपलं; उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका भीषण अपघातात ८ जणांच कुटुंब संपलं. वाळू वाहतूक करणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने झोपडीवर उलटला. यामध्ये झोपडीत झोपलेल्या कुटुंबातील ४ चिमुकल्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. याप्रकरणी ट्रकचालक आणि हेल्परला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मल्लवान शहरातील उन्नाव रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्यांमध्ये नाट समाजाचे लोक राहतात. मंगळवारी (दि.११) मध्यरात्री कानपूरहून हरदोईकडे जाणारा वाळूने भरलेला ट्रक नियंत्रणाबाहेर जाऊन अवधेश उर्फ ​​बल्ला याच्या रस्त्यालगतच्या झोपडीवर उलटला. ट्रक उलटल्यानंतर ट्रक आणि वाळूखाली संपूर्ण कुटुंब गाडले गेले. स्थानिक लोक आणि जेसीबीच्या सहाय्याने वाळू आणि ट्रक काढून त्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढले तोपर्यंत चार मुलांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.
अवधेश उर्फ ​​बल्ला (वय ४५), त्याची पत्नी सुधा उर्फ ​​मुंडी (४२), मुलगी सुनैना (११), लल्ला (५), बुद्धू (४), जावई करण (२५) त्याची पत्नी हिरो (२२), तिची मुलगी कोमल (५) अशी मृतांची नावे आहेत. अवधेश यांची मुलगी बिट्टू ही जखमी झाली आहे. तिला मल्लवण येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : 

‘पोर्शे’ कार अपघातातील बिल्डरचा पाय खोलात; हिंजवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पूर्वांचल एक्सप्रेस-वे वर भीषण अपघात : भाविकांच्या बसची उभ्या ट्रकला धडक, ४ ठार; २५ जण जखमी