जळगाव : ‘त्या’ विद्यार्थ्यांचे पार्थिव दुबई मार्गे मुंबईला पोहचणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले होते चार जून रोजी मंगळवारी रात्री घरी बोलल्यानंतर बोलत असताना वोल्खोव्हा नदीच्या किनाऱ्यावर फिरत होते त्याचा बुडून मृत्यू झाला होता. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे मुंबईला पोहचणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रशियातील सेंट …
जळगाव : ‘त्या’ विद्यार्थ्यांचे पार्थिव दुबई मार्गे मुंबईला पोहचणार

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले होते चार जून रोजी मंगळवारी रात्री घरी बोलल्यानंतर बोलत असताना वोल्खोव्हा नदीच्या किनाऱ्यावर फिरत होते त्याचा बुडून मृत्यू झाला होता. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे मुंबईला पोहचणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी रशियातील सेंट पीटर्सबर्गमधील नॉबबोर्ड या विद्यापीठात प्रवेश घेत  रशियात गेलेले होते. त्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी घटनेत अमळनेर येथील जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी (दाेघे अमळनेर) आणि हर्षल अनंतराव देसले (भडगाव)  या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या सर्वांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे मृतदेह मास्को वरून दुबई मार्गे मुंबईला पोहचणार आहे. मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाकडून नातेवाईकांना हे मृतदेह सुपूर्द केले जाणार आहेत. रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलेले असून भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी देखील संपर्क साधला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांना दुतावासाकडून मिळाली आहे. मृतदेह कधीपर्यंत पोहचतील ही नेमकी वेळ अजून कळलेली नाही.
काय घडलं होत?
हर्षल अनंतराव देसले (भडगाव) , जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) हे तिघे आणि त्यांचे सोबत शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
हेही वाचा:

दुर्देवी ! जीवापार जपलेल्या बैलांना वाचवतांना वृद्ध बळीराजाचा बुडून मृत्यू
‘फोनोफोबिया’ म्हणजे काय?; लक्षणे अन् उपचार