जळगाव: जीवापार जपलेल्या बैलांना वाचवतांना बळीराजाचा बुडून मृत्यू
जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे बोगद्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले होते या पाण्यात बैलगाडीला जिंकलेले बैलांची सुटका करत असताना 63 वर्षीय शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी (दि.११) रोजी घडली.
तालुक्यातील आसोदा गावात सुकलाल सुकलाल लालचंद माळी (वय ६३) हे आपल्या पत्नी, मुलगा आणि सुन यांच्यासोबत राहत होते. साेमवारी (दि.10) रोजी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे रस्त्यावरील असणा-या रेल्वे बोगद्यात पाणी साचलेले होते. शेती हा त्यांचा व्यवसाय असून नेहमीप्रमाणे ते मंगळवारी (दि.११) रोजी सुकलाल माळी हे सकाळी १० वाजेच्या सुमारास बैलगाडीने मन्यारखेडा रस्त्यावरील शेतात जाण्यासाठी निघाले होते. शेतात जात असताना दरम्यान रस्त्यावर रेल्वेचा बोगदा आहे. पावसामुळे या बोगद्यात पाणी साचलेले होते. त्यावेळी याकडून पलीकडे जाण्यासाठी सुकलाल माळी यांनी बैलगाडी बोगद्याखालून जाण्यासाठी टाकली. त्यात त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडीसह सुकलाल माळी हे पाण्यात बुडाले. त्यावेळी त्यांनी दोन्ही बैलांची सुटका करण्यासाठी बैलगाडीची जोत तोडली. तेव्हढयात भेदरलेल्या बैलांनी झटका देवून दोन्ही बैल पाण्याबाहेर आले. परंतु सुकलाल माळी यांना पोहताच येत नसल्याने त्यांचा साचलेल्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतमजूरांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी त्यांना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र ताेपर्यंत माळी यांचा मृत्यू झाला होता. घटना स्थळी तालुका पोलीस आले आहेत.
हेही वाचा:
Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, १२ जून २०२४
अमरावती : वीज कोसळून सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू