जम्मूच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर हल्ला; गोळीबारात एक दहशदवादी ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील रियासी आणि कठुआनंतर आता डोडामध्येही दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. तीन दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या कार्यरत तळावर गोळीबार केला.
या हल्ल्यानंतर डोडा येथील छत्रकला येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात लष्कराचे पाच जवान जखमी झाले आहेत. तर कठुआमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे.
डोडा येथील गोळीबारातील जखमींमध्ये एका विशेष पोलीस अधिकाऱ्याचा (एसपीओ) समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काश्मीर टायगर नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
#WATCH | Jammu and Kashmir: Search operation underway in Bhaderwah, Doda as an encounter is underway between security forces and terrorists in Chattargala area of Doda.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/AyaBVYQDXR
— ANI (@ANI) June 12, 2024