पुणे : शिधा आलाच नाही, तर लाभार्थींना कसा द्यायचा?

पुणे : शिधा आलाच नाही, तर लाभार्थींना कसा द्यायचा?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त दिला जाणार्‍या आनंदाचा शिधा किटमधील काही ठिकाणी साखर, तेल, पोहे आणि रवा दुकानात पोहचला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना वाटप करायचे तरी कसे? असा सवाल एका स्वस्त धान्य दुकानदाराने केला आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाभार्थ्यांच्या उत्सवावर पाणी फिरले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 3 लाख 23 हजार 456 लाभार्थी असून, यातील केवळ 33 टक्के लाभार्थ्यांपर्यंतच आनंदाचा शिधा किट पोहचला आहे. शहरातील स्वस्त धान्य दुकांनामध्ये सोमवारपर्यंत काही ठिकाणी साखर, रवा, पोहे, तेल पोहचला नाहीच; तर दुसरीकडे सगळ्या वस्तू मिळाल्याशिवाय किट वाटप करू नये, असे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे लाभार्थ्यांना दुकानावर चकरा मारल्याशिवाय पर्याय नाही. पुणे शहर अन्नवितरण कार्यालयाच्या नियोजनाअभावी लाभार्थ्यांची दिवाळी कडू झाली आहे. दरम्यान, अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते म्हणाले की, आताची माहिती माझ्याकडे नाही. दुकानात सगळे जिन्नस पोहचले आहेत. माझ्या माहितीनुसार, रविवारपर्यंत 33 टक्के लाभार्थ्यांनी किट नेले आहेत. तांत्रिक अचडण येत असल्याने ऑफलाइनही किटचे वितरण करण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा
Uttarakhand Tunnel Crash News | बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी ९०० मिमी पाइपचा वापर, तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी
कोल्हापुरात पाडव्याच्या मुहूर्ताला गुळाचे सौदे; ११ हजार रूपयांचा विक्रमी दर
पंतप्रधानांच्या फॅक्टर्‍या कोणी कोणी पाहिल्या; राहुल गांधींचा सवाल
The post पुणे : शिधा आलाच नाही, तर लाभार्थींना कसा द्यायचा? appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीनिमित्त दिला जाणार्‍या आनंदाचा शिधा किटमधील काही ठिकाणी साखर, तेल, पोहे आणि रवा दुकानात पोहचला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना वाटप करायचे तरी कसे? असा सवाल एका स्वस्त धान्य दुकानदाराने केला आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाभार्थ्यांच्या उत्सवावर पाणी फिरले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 3 लाख 23 हजार …

The post पुणे : शिधा आलाच नाही, तर लाभार्थींना कसा द्यायचा? appeared first on पुढारी.

Go to Source