बीड : गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराज यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
आष्टी, Bharat Live News Media वृत्तसेवा: गहिनीनाथ गडाचे महंत ह.भ.प. विठ्ठल महाराज आणि त्यांच्या गाडीचे चालक अपघातात जखमी झाले होते. विठ्ठल महाराज यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती. आज (दि.११) त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
यावेळी गहिनीनाथ गडालगत असणारी त्यांची जन्मभूमी म्हसोबाचीवाडी येथे थांबून ग्रामदैवत म्हसोबाचे दर्शन घेतले. म्हसोबाचीवाडी व पंचक्रोशीतुन आलेल्या भाविकांनी व ग्रामस्थांकडून त्यांच्यावर फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण करून दर्शन घेतले.
भाविकांनी त्यांच्या आरोग्यासाठी ग्रामदेवत म्हसोबा चरणी साकडे घातले. याप्रसंगी म्हसोबावाडी व पंचक्राशीतील भक्तगण उपस्थित होते.
हेही वाचा
बीड : माजलगाव येथील हिवरा बु. गावात वीज पडून ९ मेंढ्यांचा मृत्यू
बीड: ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट’च्या सुरेश कुटेला अटक; ६ दिवसांची पोलीस कोठडी
बीड: केज येथे ३ हजारांची लाच घेताना मुख्याध्यापक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात