Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री राशि खन्ना ही विक्रांत मेसीसोबतच्या तिच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केलीय. तिने या चित्रपटाचं नाव देखील सांगितलं आहे. यापूर्वी ‘टीएमई’ नावाच्या त्यांच्या चित्रपटाचे नाव आता ‘तलाखों में एक’ असेल. या चित्रपटात आपण कधीही न पाहिलेली कथा पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा-
‘मिर्जापूर सीजन ३’ च्या टीजरने फॅन्स नाराज? ‘मुन्ना भैया’ला शोधत राहिले लोक
चित्रपट निर्माते बोधयन रॉय चौधरी दिग्दर्शित, ‘तलाखों में एक’ जाहीर झाल्यापासून चर्चांना उधाण आलं आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ मधील त्यांच्या अभिनयानंतर हा चित्रपट विक्रांत मेसीसोबत राशि खन्नाचा दुसरा प्रोजेक्ट आहे.
राशि खन्ना – विक्रांत मेसी
अधिक वाचा-
पंचायत थ्री फेम जितेंद्रच्या ‘कोटा फॅक्टरी ३’ चा ट्रेलर रिलीज
‘द साबरमती रिपोर्ट’ अद्याप रिलीज व्हायचा असताना या वर्षाच्या सुरुवातीला अनावरण झालेल्या या टीझरमध्ये राशीच्या प्रभावी कामगिरीची झलक दिसून आली.
अधिक वाचा-
वृक्षसंपदा जपण्याचा संघर्ष उलगडणार ‘झाड’ चित्रपटातून!
तिने २०२४ ची सुरुवात ‘अरनमानाई ४’ या मोठ्या हिटसह केली. या चित्रपटाने जगभरात १०० कोटींहून अधिक कमाई केली आणि ‘थिरुचित्रंबलम’ आणि ‘सरदार’ नंतर तिचे सलग तिसरे यश चिन्हांकित केले. राशी आता सिद्धू जोन्नालगड्डा सोबत तिचा तेलुगु चित्रपट ‘तेलुसू कडा’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे.
View this post on Instagram
A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)