‘कुणबी’ कुटुंबांना मिळावा ‘मोदी आवास’

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मराठा कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेचा लाभ, मराठा कुणबी प्रवर्गातील कुटुंबांतील एकालाही ओबीसी प्रमाणपत्र असेल तरी त्या कुटुंबातील इतर सदस्यांना मिळावा अशा मागणीचे निवेदन … The post ‘कुणबी’ कुटुंबांना मिळावा ‘मोदी आवास’ appeared first on पुढारी.
#image_title

‘कुणबी’ कुटुंबांना मिळावा ‘मोदी आवास’

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मराठा कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेचा लाभ, मराठा कुणबी प्रवर्गातील कुटुंबांतील एकालाही ओबीसी प्रमाणपत्र असेल तरी त्या कुटुंबातील इतर सदस्यांना मिळावा अशा मागणीचे निवेदन शेवगाव तालुका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की मोदी आवास योजनेंतर्गत ओबीसी घटकांसाठी शासनाच्या वतीने घरकुल योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावर मागविण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :

मराठा आरमारातील गुराब जहाजाची प्रतिकृती
Maratha Reservation : कायदेशीर सल्ला घेऊनच आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता : पृथ्वीराज चव्हाण

यामध्ये प्रशासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा घेऊन पात्र लाभार्थ्यांकडून घरकुल योजनेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यात मराठा कुणबी प्रवर्गातील लाभार्थी निवडताना एका कुटुंबातील ज्या सदस्याच्या नावे कुणबी प्रमाणपत्रात असेल त्याच सदस्याला या योजनेचा लाभ दिला जाणार असून कुटुंबातील इतर सदस्यांना त्याचा लाभ दिला जाणार नाही, म्हणजे कुटुंबातील पतीच्या नावे कुणबी प्रमाणपत्र असेल आणि पतीचे निधन झाले असेल, तरी त्या कुटुंबातील पत्नी किंवा मुलांना प्रमाणपत्राअभावी या योजनेचा लाभ मिळणार नाही. असे ग्रामसेवक ग्रामसभेत सांगत आहेत. म्हणजेच कुटुंबातील पती कुणबी आणि पत्नी व मुले, आजोबा, चुलते मराठा कसे, असा प्रश्न मराठा महासंघाने विचारला आहे. कुटुंबातील कुठल्याही सदस्याकडे कुणबीचे प्रमाणपत्र असल्यास त्याच कुटुंबातील इतर सदस्यांना त्याच्या आधारे घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. असून केवळ प्रस्तावकाच्या नावे कुणबी प्रमाणपत्र नाही म्हणून जर शासन प्रस्ताव नाकारत असेल, तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस रावसाहेब मरकड, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फसले, रामनाथ रुईकर, प्रवीण खोमणे, अशोक चव्हाण, राजेंद्र पोटफोडे, गौतम सुरासे, भीमराज बेडके, राजेंद्र पातकळ, गणेश म्हस्के, चंद्रकांत निकम, विष्णू दुकळे, बाळासाहेब भागवत, भाऊसाहेब सामृत, सुनील गवळी, सुनील रणमले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
The post ‘कुणबी’ कुटुंबांना मिळावा ‘मोदी आवास’ appeared first on पुढारी.

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  मराठा कुणबी प्रमाणपत्र असलेल्या कुटुंबांना मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने गटविकास अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. केंद्र सरकारच्या नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या मोदी आवास योजनेचा लाभ, मराठा कुणबी प्रवर्गातील कुटुंबांतील एकालाही ओबीसी प्रमाणपत्र असेल तरी त्या कुटुंबातील इतर सदस्यांना मिळावा अशा मागणीचे निवेदन …

The post ‘कुणबी’ कुटुंबांना मिळावा ‘मोदी आवास’ appeared first on पुढारी.

Go to Source