गुडाळ (राधानगरी) ; आशिष पाटील : उद्या शुक्रवारी होत असलेल्या ‘भोगावती’ च्या चेअरमन- व्हाईस चेअरमन निवडीबाबत नूतन संचालकांची मते जाणून घेण्यासाठी सत्तारूढ आघाडीच्या २४ संचालकांची बैठक आज गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेच्या प्रधान कार्यालयात होत आहे. आ. पी. एन. पाटील आणि आघाडीच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. चेअरमन पद करवीरमध्ये आणि व्हाईस चेअरमन पद राधानगरीत यावर बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
संबंधित बातम्या
हिंगोली : जिंतूर- औंढा मार्गावरील धारफाटा येथे ट्रकची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू
परभणी : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा; भाजपची मागणी
शौर्यदिन कार्यक्रमाची तयारी करा ; प्रांताधिकारी स्नेहा देवकाते यांचे निर्देश
१९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या भोगावतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार संपतराव पवार -पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे, जनता दलाचे वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडीने २५ पैकी २४ जागा मिळवून सत्ता कायम राखली आहे. श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेत गुरुवारी (दि. ३०) रोजी सायंकाळी इच्छुकांची तसेच अन्य संचालकांची मते आजमावण्यात येतील. चेअरमनपद करवीर तालुक्यात तर व्हा. चेअरमनपद राधानगरी तालुक्यात हे जवळपास निश्चित झाले आहे.
नव्या वर्षात येणाऱ्या विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता आ. पाटील यांनी पुन्हा करवीरमध्येच चेअरमन पद कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. बी. ए. पाटील (वाशी )किंवा प्रा. एस. ए. पाटील (देवाळे ) या दोघांपैकी एका नावाचा विचार होऊ शकतो. दोघेही पाटील यांचे निष्ठावंत असले तरी अजात शत्रू व्यक्तिमत्व, सहकारातील अभ्यासू आणि सर्वांना चालणारे नाव म्हणून बी. ए. पाटील यांच्या नावावर एकमत होऊ शकते. व्हा. चेअरमन पदी ए. वाय. पाटील समर्थक राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या राजाराम कवडे ( आवळी बुद्रुक) यांची वर्णी लागू शकते.
गुरुवारी संचालकांची बैठक होणार असली तरी चेअरमन- व्हाईस चेअरमन पदाच्या नावांची घोषणा मात्र, शुक्रवारी सकाळी कोल्हापूर येथील आमदार पी. एन. पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे. आणि नेते मंडळी आणि संचालकांचा ताफा निवडीसाठी भोगावतीकडे रवाना होईल असे सांगण्यात येत आहे.
The post ‘भोगावती’ चे चेअरमनपद करवीरला तर व्हा. चेअरमनपद राधानगरीला? appeared first on पुढारी.
गुडाळ (राधानगरी) ; आशिष पाटील : उद्या शुक्रवारी होत असलेल्या ‘भोगावती’ च्या चेअरमन- व्हाईस चेअरमन निवडीबाबत नूतन संचालकांची मते जाणून घेण्यासाठी सत्तारूढ आघाडीच्या २४ संचालकांची बैठक आज गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील श्रीपतरावदादा बोंद्रे बँकेच्या प्रधान कार्यालयात होत आहे. आ. पी. एन. पाटील आणि आघाडीच्या नेते मंडळींच्या उपस्थितीत ही बैठक …
The post ‘भोगावती’ चे चेअरमनपद करवीरला तर व्हा. चेअरमनपद राधानगरीला? appeared first on पुढारी.