Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नीट परीक्षेत पेपरफुटी व निकालातील वाढीव गुण प्रकरणी दाखल याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला नोटीस बजावली.
या प्रकरणी पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होईल. तोपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आपले उत्तर दाखल करेल, असेही आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
SC: Issue notice. Let the matter be heard on July 8. Tag this with the plea coming up. Let reply be filed by NTA
Nedumpara: let the counselling be stayed
SC: We will not stop the counselling, if you argue further we will dismiss this. #SupremeCourt #NEET_परीक्षा_परिणाम…
— Bar and Bench (@barandbench) June 11, 2024
नीट परीक्षा घोळाची चौकशी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक समितीही स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी कोलकाता उच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली आहे.
Supreme Court issues notice to National Testing Agency (NTA) on pleas seeking fresh NEET-UG, 2024 examination amid allegations of paper leak. pic.twitter.com/CNS8tur9QS
— ANI (@ANI) June 11, 2024
याचिकेतून काय मागणी ?
आंध्र प्रदेशातील कार्तिक नावाच्या विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना परीक्षेत ग्रेस गुण देण्याच्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे . नीट परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याने १५३६ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आले आहे. मेघालय, हरियाणा, छत्तीसगड, सुरत आणि चंदीगडसह राज्यातील ६ परिक्षा केंद्रांतील विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रार केली होती.नीट परिक्षेतील या गोंधळावर राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंह यांनी परीक्षेत पेपरफुटी व घोळ झाला नसल्याचे पत्रकारपरिषद घेऊन स्पष्ट केले होते.