जपानमध्ये लठ्ठ असणेही बेकायदेशीर!
टोकियो : जगभरात जितके देश, तितके नियम. काही नियम अतिशय महत्त्वाचे, अगदी अनुकरणीय तर काही नियम मात्र अगदी थक्क करायला लावणारे. आता असाच एक थक्क करायला लावणारा नियम जपानमध्ये आहे. हा नियम म्हणजे जपानमध्ये चक्क लठ्ठ असणे बेकायदेशीर आहे.
जगात विश्वास ठेवता येणार नाही, अशा काही नियमांपैकी हा एक अफलातून नियम आहे. जपानमध्ये जाड असण्यासाठी लोकांना चक्क शिक्षा दिली जाते. तसे पाहता, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतो, प्रत्येकाची शरीरयष्टी वेगळी असते. मात्र, एखादी व्यक्ती जाड आहे किंवा अगदीच किरकोळ आहे यावरून कोणी शिक्षा देऊ शकते का, हा विचारही मनात येणार नाही. पण, जपानमध्ये मात्र हा नियम प्रत्यक्षात अमलात आणला जातो आणि प्रदीर्घ कालावधीपासून त्याचे काटेकोर पालन केले जाते.
लठ्ठपणा या देशात बेकायदेशीर मानला जातोच. पण, यासाठी या जाड लोकांना शिक्षाही मिळते. जपानमध्ये लठ्ठपणा थांबविण्यासाठी नियम आहेत. यासाठी ‘मेटा बो लॉ’ आहे. 2008 मध्ये जपानच्या स्वास्थ, कल्याण मंत्रालयाने हा कायदा जारी केला होता. या कायद्यांतर्गत 40 ते 74 वयांतील पुरुष आणि महिलेच्या कमरेचे माप घेतले जाते. पुरुष आणि महिलांच्या कमरेचा आकार किती असावा, हे यात निश्चित केले आहे. लठ्ठपणामुळे कुठलाही आजार होऊ नये, असे तेथील सरकारला वाटते आणि त्यामुळे हा नियम तेथे लागू करण्यात आला आहे. येथे लठ्ठपणा असणार्या नागरिकांना शिक्षा म्हणून कमी होण्याचा क्लास घ्यावा लागतो. क्लासेस आरोग्य विमान कंपनीकडून आयोजित केले जातात आणि त्यात सहभागी होणे अशा जाड व्यक्तींना सक्तीचे असते!