टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व 20 संघ ‘फायनल’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. हा संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. आफ्रिका रिजन क्वालिफायरमध्ये युगांगाडाने रवांडाचा 9 विकेट्सने पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा युगांडा हा 20 वा संघ ठरला आहे. मात्र, दुसरीकडे युगांडाच्या विजयासह झिम्बाब्वेचा … The post टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व 20 संघ ‘फायनल’! appeared first on पुढारी.
#image_title

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व 20 संघ ‘फायनल’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. हा संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. आफ्रिका रिजन क्वालिफायरमध्ये युगांगाडाने रवांडाचा 9 विकेट्सने पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा युगांडा हा 20 वा संघ ठरला आहे. मात्र, दुसरीकडे युगांडाच्या विजयासह झिम्बाब्वेचा संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
टी-20 विश्वचषक 2024 साठी पात्र ठरलेले संघ (T20 World Cup 2024)
2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश या 12 संघांना स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आहे. तर आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा हे आठ संघ पात्रता फेरीतून एन्ट्री घेण्यात यशस्वी ठरले आहेत.

Presenting the 2⃣0⃣ teams that will battle for ICC Men’s #T20WorldCup 2024 🏆
✍: https://t.co/9E00AzjcRN pic.twitter.com/1nu50LOLWQ
— ICC (@ICC) November 30, 2023
आगामी टी-20 विश्वचषकाचे स्वरूप असे असेल
आगामी टी-20 विश्वचषक 3 जून ते 30 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा एकूण बाद फेरीसह तीन टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 4 संघांच्या 5 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील अव्वल 2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व आठ संघांना 4-4 च्या 2 गटांमध्ये विभागले जाईल. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.
याचा अर्थ असा की पुढचा टी-20 विश्वचषक मागील टी-20 विश्वचषकापेक्षा खूप वेगळा असेल आणि त्यात पात्रता फेरी खेळली जाणार नाही किंवा सुपर-12 टप्पाही होणार नाही. गेल्या टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला होता. पात्रता फेरीतून चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला होता.
The post टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व 20 संघ ‘फायनल’! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : युगांडा क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. हा संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. आफ्रिका रिजन क्वालिफायरमध्ये युगांगाडाने रवांडाचा 9 विकेट्सने पराभव करून ही ऐतिहासिक कामगिरी केली. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरणारा युगांडा हा 20 वा संघ ठरला आहे. मात्र, दुसरीकडे युगांडाच्या विजयासह झिम्बाब्वेचा …

The post टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व 20 संघ ‘फायनल’! appeared first on पुढारी.

Go to Source