मंत्रालयाचा पहिला दिवस..! परराष्‍ट्र मंत्री, रेल्‍वे मंत्र्यांनी स्‍वीकारला पदभार

मंत्रालयाचा पहिला दिवस..! परराष्‍ट्र मंत्री, रेल्‍वे मंत्र्यांनी स्‍वीकारला पदभार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी रविवारी ( ९ जून) शपथ घेतली. त्‍यांच्‍यासह ७२ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सोमवारी सायंकाळी खाते वाटपही झाले. नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात कोणतेही मोठे फेरबदल टाळले. आज (दि. ११) एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून तर अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्री म्हणून, भूपेंद्र यादव यांनी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
पुन्हा एकदा परराष्‍ट्र मंत्रालयाची जबाबदारी मोठा सन्‍मान : एस. जयशंकर
परराष्‍ट्र मंत्री म्‍हणून पदभार स्‍वीकारल्‍यानंतर एस. जयशंकर म्‍हणाले की, “परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली हा एक मोठा सन्मान आहे. मागील सरकारमध्‍ये या मंत्रालयाने उत्कृष्ट कामगिरी केली. आम्ही G20 चे अध्यक्षपद भूषवले. कोरोनाची आव्हाने स्वीकारली. आम्ही ऑपरेशन गंगा आणि ऑपरेशन कावेरी सारख्या महत्त्वपूर्ण ऑपरेशन्स राबवली. परराष्‍ट्र मंत्रालय सुधारित पासपोर्ट सेवांच्या बाबतीत खूप लोक-केंद्रित मंत्रालय बनले आहे.”
रेल्वे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा : अश्विनी वैष्णव
अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्‍वे मंत्रीपदाचा पदभार स्‍वीकारला. तसेच त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभारही स्वीकारला आहे. यानंतर बोलताना ते म्‍हणाले की, देशातील जनतेने पंतप्रधान मोदींना पुन्हा देशसेवा करण्यासाठी आशीर्वाद दिला आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेम विद्युतीकरण, नवीन ट्रॅकचे बांधकाम, नवीन ट्रेनचे बांधकाम, रेल्‍वे स्थानकांचा पुनर्विकासाचे मोठ काम केले आहे. रेल्वे ही सामान्य माणसाच्‍या प्रवासाचे साधन आहे. तसेच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत कणा आहे, म्हणून रेल्वेच्‍या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्‍य दिले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

#WATCH | Delhi: On India’s UNSC seat in the next 5 years, EAM Dr S Jaishankar says “It has different aspects and I am fully confident that under PM Modi’s leadership, the foreign policy of Modi 3.0 will be very successful…For us, the influence of India has been steadily… pic.twitter.com/0IbUO6NSIc
— ANI (@ANI) June 11, 2024

#WATCH | Delhi: Railways Minister Ashwini Vaishnaw says, “People have blessed PM Modi again to serve the country. Railways will have a very big role. In the last 10 years, PM Narendra Modi has done a lot of reforms in railways. Be it the electrification of railways, construction… pic.twitter.com/aHA11bXBPc
— ANI (@ANI) June 11, 2024

#WATCH | Delhi: Bhupender Yadav takes charge as the Minister of Environment, Forest and Climate Change pic.twitter.com/etnsjXEIks
— ANI (@ANI) June 11, 2024