‘आप’ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा : पक्ष कार्यालयाबाबत दिला निर्णय

‘आप’ला सुप्रीम कोर्टाचा दिलासा : पक्ष कार्यालयाबाबत दिला निर्णय


नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा: पक्ष कार्यालय रिकामे करण्याच्या प्रकरणात आम आदमी पक्षाला सर्वोच्च न्यायालयाकडून आज (दि.10) दिलासा मिळाला आहे. कोर्टाने आपला राऊस एव्हेन्यू येथील कार्यालय रिकामे करण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 15 जूनपर्यंत सध्याचे कार्यालय रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ही मुदत वाढवण्याची मागणी करणारी याचिका आपने दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना कार्टाने हा आदेश दिला आहे.
ही मुदतवाढ ही शेवटची संधी म्हणून देण्यात आली असून ती पक्षाने दिलेल्या वेळेच्या अधीन असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. कोर्टाच्या रजिस्ट्रीला दिलेले हमीपत्रात 10 ऑगस्ट 2024 रोजी किंवा त्यापूर्वी कार्यालयाचा ताबा देण्यात येईल, असे म्हटले आहे. खंडपीठाने आदेशात म्हटले आहे की, 10 ऑगस्टपर्यंत ही जागा रिकामी करावी, यानंतर ही मुदत वाढवली जाणार नाही. वास्तविक, ‘आप’च्या कार्यालयाची जमीन दिल्ली उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. आता ही जागा न्यायालय वापरणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात दिलेल्या निर्णयात म्हटले होते की, आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, दिल्ली उच्च न्यायालयाच्या विस्ताराच्या उद्देशाने दिलेल्या भूखंडावर आपचे कार्यालय रिकामे करण्यासाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यावर आपची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी असा युक्तिवाद केला की, पक्षाला राष्ट्रीय दर्जा आहे. परंतु, इतर राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत आपला कमी जागा देण्यात आली आहे.
हेही वाचा 

अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचा भाजपचा डाव, आपचा आरोप
‘आप’च्‍या मंत्री अतिशी यांना समन्‍स, केजरीवाल म्‍हणतात, अटक करण्याचे षडयंत्र
अमृतसरमध्ये मतदानापूर्वी आप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, ४ जखमी

Go to Source