‘नीट’ परीक्षा वाद : राहुल गांधींची विद्यार्थ्यांना ग्‍वाही,” मी संसदेत…”

‘नीट’ परीक्षा वाद : राहुल गांधींची विद्यार्थ्यांना ग्‍वाही,” मी संसदेत…”


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्‍या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षे (NEET)चा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुणांमध्ये झालेली वाढ हा वादाचा विषय ठरला आहे. “या प्रश्‍नी मी संसदेत तुमचा आवाज असेन,” अशी ग्‍वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे.
यंदा  ‘नीट’ परीक्षार्थींना अधिक गुण मिळालेल्‍यांची संख्‍या वाढली आहे. त्‍यामुळे चांगले गुण मिळवलेल्यांनाही सरकारी महाविद्यालयांतील प्रवेश दूरचा ठरण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी ७.१७ वाजता होणाऱ्या शपथविधी समारंभापूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, “नरेंद्र मोदींनी अद्याप शपथही घेतली नाही आणि NEET परीक्षेतील अनियमिततेमुळे २४ लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. एकाच परीक्षा केंद्रातील 6 विद्यार्थी जास्तीत जास्त गुणांसह परीक्षेत अव्वल असतात, अनेकांना असे गुण मिळतात जे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसतात, परंतु सरकार सतत पेपर फुटण्याची शक्यता नाकारत आहे.”
हेही वाचा : 

मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्‍या राष्‍ट्रवादीला प्रतिनिधित्व नाही! फडणवीसांनी सांगितले कारण
‘मला माफ करा…’: ‘बीजेडी’च्‍या पराभवानंतर व्हीके पांडियन यांची राजकारणाला सोडचिठ्ठी
NDA Cabinet 3.0 : भाजपचे 32, TDP-JDU ला 2-2; जाणून घ्या संभावित मंत्र्यांची यादी

Go to Source