राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरीत शनिवारी मेळावा
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी (दि.2) सायंकाळी सहाला पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर शरद पवार गटाचा हा शहरातील पहिलाच मेळावा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
या वेळी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. जयदेव गायकवाड, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हाबिब, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे मध्यवर्ती कार्यालय पिंपरी चौकातील शनी मंदिराशेजारी उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्या निमित्त कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. तसेच, पदाधिकार्यांना नियुक्ती पत्राचे वितरण केले जाणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार गटाचा हा शहरात पहिलाच मेळावा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा शहरात पहिला मेळावा
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पिंपरी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात येत आहे. पक्षाकडे तरूणांचा ओढा वाढत आहे. तसेच, संघटन मजबूत केले जात आहे. त्यानिमित्त कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. या कार्यालयामुळे शहरभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच, नागरिकांना संपर्क ठेवणे सुलभ होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवड आगाराला दिवाळी भेट; मिळाले 26 लाख रुपयांचे उत्पन्न
Pimpri News : पोलिस ऑन ड्युटी 24 तास
Pune News : कात्रजकडून गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांनी कपात
The post राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरीत शनिवारी मेळावा appeared first on पुढारी.
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी (दि.2) सायंकाळी सहाला पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात आयोजित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर शरद पवार गटाचा हा शहरातील पहिलाच मेळावा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या वेळी पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री …
The post राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरीत शनिवारी मेळावा appeared first on पुढारी.