Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 AD ‘ या चित्रपटासाठी साऊथ स्टार प्रभास, बिंग बी आणि अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण चर्चेत आली आहे. याआधी या चित्रपटातील प्रभासचा लूक पहिल्यांदा शेअर करण्यात आला. यानंतर सहअभिनेते अमिताभ बच्चन यांचा लूकही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमिताभ ‘अश्वत्थामा’ च्या अवतारात दिसले आहेत. आता निर्मात्यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणचा नवा लूक शेअर केला आहे. हा लूक पाहून चहत्यांची चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे.
नुकतेच अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘कल्की 2898 AD’ चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. दीपिकाचा हा स्टनिंग लूक खूपच आकर्षक आहे. या फोटोत दीपिका एका ठिकाणी उभी असलेली दिसत आहे. पण तिच्या मागे अनेक मोठे पर्वत देखील दिसत आहेत. या फोटोत पाऊसही पडत असून दीपिका ओलिचिंब झाली आहे. अतिशय लहान केस असलेल्या दीपिकाचा हा लूक भारदस्त दिसला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे की, ‘𝐓𝐡𝐞 𝐡𝐨𝐩𝐞 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐡𝐞𝐫.’. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाबहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव झाला. या फोटोला २ तासांत ५ लाखाहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. दरम्यान दीपिका पती आणि अभिनेता रणवीर सिंहने ‘बूम – अमेझिंग थिंग’. अशी कॉमेन्टस केली आहे.
चित्रपटाच्या कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 AD’ या सायन्स फिक्शन चित्रपटात प्रभास, कमल हासन, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, दिशा पटानी आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वैजयंती मुव्हीज निर्मित हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजे, १० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘कल्की 2898 AD’ हा चित्रपट हिंदू पौराणिक कथांवर आधारित आहे.
हेही वाचा
Kalki 2898 AD : ‘कल्कि 2898 एडी’ चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज, प्रभासचा ‘हाईड’ लूक
Kalki 2898AD : प्रभासच्या चित्रपटाची प्रतीक्षा संपली! ‘कल्की 2898 एडी’ यादिवशी येणार
‘कल्की 2898 AD’मधील प्रभासची झलक समोर, ट्रेलरची उत्सुकता
View this post on Instagram
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)