राजकीय धडे गिरवीत रक्षा खडसे यांचा गौरवशाली प्रवास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – कोथळी या गावापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या रक्षा निखिल खडसे आज केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खडतर व अनेक अडचणींना सामोरा गेलेला आहे. पतीच्या निधनानंतर सासरे एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे गिरवीत आज त्यांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रक्षा खडसे …

राजकीय धडे गिरवीत रक्षा खडसे यांचा गौरवशाली प्रवास

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – कोथळी या गावापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या रक्षा निखिल खडसे आज केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांचा हा प्रवास खडतर व अनेक अडचणींना सामोरा गेलेला आहे. पतीच्या निधनानंतर सासरे एकनाथ खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय धडे गिरवीत आज त्यांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रक्षा खडसे यांचे ‘बीएससी कॉम्प्युटर पर्यंत शिक्षण झाले आहे. माजी महसूलमंत्री यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य (स्व.) निखिल खडसे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर गुण्या गोविंदाने सर्व सुरू होते. घरामध्ये नेहमी राजकीय वातावरण असल्यामुळे सामाजिक जबाबदारी व आवड यातून त्यांनी आपली सुरुवात ग्रामपंचायत पासून केली 2010 -2012 पर्यंत कोथळी येथील सरपंचपदी त्या विराजमान झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून 2012 ते 2014 या कारकिर्दीत त्यांनी काम पाहिले. यात सभापती स्वास्थ शिक्षण आणि खेळ या विभागाची त्यांनी जबाबदारी सांभाळली. याच काळात अचानक त्यांच्या जीवनातील वारे बदलले. 1 मे 2013 रोजी निखिल खडसे यांनी स्वतःच्या घरात गोळी मारून आत्महत्या केली. यानंतर रक्षा खडसे यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. २०१४ मध्ये पतीच्या निधनाचे दुःख पेलवत त्या मोठ्या मताधिक्याने खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाल्या
पतीचे निधन व सासरे यांना सर्वात मोठा धक्का बसलेला असताना त्यांनी सुनेला 2014 मध्ये प्रथम लोकसभेसाठी उभे केले. या निवडणुकीत त्यांनी मनीष जैन या प्रतिस्पर्धी उमेदवाराला तीन लाख 18 हजार मतांनी पराभूत केले. 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी  विजयाची घोडदौड कायम ठेवत आलेख चार लाखापर्यंत नेला. 2024 च्या निवडणुकीत अतिथीच्या सामन्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांना अडीच लाख मतांनी पराभूत करत विजयाची हॅट्रिक साजरी केली.
खासदार रक्षा खडसे या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत. अनेक आघात कोसळून देखील संकटावर मात करीत ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ते खासदार असा अल्पावधीत प्रवास करीत गावासह पंचक्रोशीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा खासदार रक्षा खडसे यांनी उमटवला आहे. मतदारांनी रक्षा खडसे यांच्यावर विश्वास दाखवीत त्यांना लोकसभेत पाठविले.

संधीचे सोने करीत श्रीमती खडसे बांनी पाच वर्षांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत, केंद्र शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या आहेत. – दीपक चौधरी, मुक्ताईनगर.

खडसे यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवत राजकीय जीवनाचा प्रवास सुरु झाला. २०१० ते २०१२ पर्यंत त्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले. त्यानंतर एप्रिल २०१२ मध्ये विजयी होऊन जिल्हा परिषद सदस्यानंतर कार्यकर्तृत्वावर २०१२ ते २०१४ दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य सभापती म्हणून पद सांभाळले. या कालावधीत त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक गुणवत्तावाढीकडे लक्ष दिले. जिल्हा परिषद शाळेत संगणक आणून दिले. या कामामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. सासऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत मतदारसंघात मताधिक्य वाढविण्यात त्या यशस्वी होत होत्या. त्यात नियतीने डाव साधला आणि पतीचे निधन झाले. पण सासरे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची शिकवण, कितीही अडचणी आल्या, परिस्थिती कशीही असली तरी वारसा आपला जनसेवेचा आहे, तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. सासरे खडसे यांनी दिलेल्या हिमतीने पुढे येत एक महिला असतानाही त्यात सून, मुलगी, आई, बहीण हे सर्व नाते सांभाळत एक उत्कृष्ट राजकारणी म्हणून त्या भूमिका पार पाडत आहेत.
जळगाव : खासदार रक्षा खडसे यांनी वाढदिवस साजरा करून लोकसभा 2024 साठी मतदानाच्या दिवशी सासरे एकनाथ खडसे यांचा आशीर्वाद घेतला होता.
कार्यकत्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य
२०१४ त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवली व विजयी झाल्या. त्यात खासदार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत मतदारसंघात तब्बल १२०० गावांना भेटी दिल्या. एक महिला असल्यावरही मतदारसंघात प्रत्येक गावात भेट देणाऱ्या पहिल्या खासदार असल्याची एक ओळख तयार केली. राजकारणाकोबर समाजकारणाची आवड असल्याने त्यांच्याकडून गुरुनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिरासारखे अनेक गोरगरिबांच्या हिताचे उपक्रम राबविले जात आहेत.
हेही वाचा:

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदी इंदिरा गांधींच्‍या ‘त्‍या’ विक्रमाशी बरोबरी करणार का?
NDA Cabinet 3.0 : भाजपचे 32, TDP-JDU ला 2-2; जाणून घ्या संभावित मंत्र्यांची यादी