बेपत्ता झाली, ३ दिवसांनी अजगराच्या पोटात सापडली
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: मध्य इंडोनेशियामधील एक महिला अजगराच्या पोटात मृतावस्थेत (Missing Indonesian woman) आढळून आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर तीन दिवसांनी संबंधित महिला अजगराच्या पोटात जशी आहे तशी सापडली आहे, असे एका स्थानिक अधिकाऱ्याने शनिवारी (दि.८ जून) वृत्तसंस्था एएफपीला सांगितलेआहे, या संदर्भतील वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
इंडोनेशियातील 45 वर्षीय फरीदा या दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावातील रहिवाशी आहेत. गुरुवारी रात्री त्या बेपत्ता (Missing Indonesian woman) झाल्या. त्यानंतर त्यानंतर, शोध मोहीम सुरू करण्यात आली, असे गावचे प्रमुख सुआर्दी रोसी यांनी एएफपीला सांगितले.
शोधमोहिमेदरम्यान संबंधित महिलेच्या पतीला पत्नीच्या संशयास्पद वस्तू एका ठिकाणी सापडल्या. त्यानंतर गावकऱ्यांनी परिसरात शोध घेतला. यावेळी त्यांना एक मोठा पोट फुगलेला असलेला अजगर दिसला,” असेही सुआर्डी यांनी म्हटले आहे. “त्यांनी अजगराचे पोट फाडण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर फरीदा या महिलेचे डोके दिसल्याचेही,” ते पुढे म्हणाले. त्यानंतर ती पूर्ण कपडे घातलेली बेपत्ता महिला अजगराच्या पोटात आढळली (Missing Indonesian woman). या अजगराची लांबी सुमारे 5 मीटर (16 फूट) इतकी असल्याची मोजण्यात आली आहे.
अशा घटना या दुर्मिळ आहेत. तरीही अलिकडच्या वर्षांत इंडोनेशियामध्ये अजगराने संपूर्ण व्यक्ती गिळल्याच्या अनेक प्राणघातक घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी, आग्नेय सुलावेसीमधील टिनंगगिया जिल्ह्यातील रहिवाशाला आठ मीटरचा अजगराने आढळला, ज्याला त्यांने मारले कारण तो गावातील एका शेतकऱ्याचा गळा दाबून खात होता. 2018 मध्ये, दक्षिण-पूर्व सुलावेसी येथे असलेल्या मुना शहरामध्ये 54 वर्षीय महिला सात मीटरच्या अजगराच्या पोटात मृतावस्थेत सापडली होती. दरम्यान मागील वर्षीच पश्चिम सुलावेसीमधील एक शेतकरी गायब झाला होता, नंतर पाम तेलाच्या मळ्यात चार मीटरच्या अजगराने त्या शेतकऱ्याला जिवंत खाल्लेला आढळला.
View this post on Instagram
A post shared by India Today (@indiatoday)