नरेंद्र मोदी इंदिरा गांधींच्‍या ‘त्‍या’ विक्रमाशी बरोबरी करणार का ?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे.  नरेंद्र मोदी आज ( दि. ९ जून) सायंकाळी पंतप्रधानपदी शपथ घेणार आहेत. ते सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेणारे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या विक्रमाशी ते बरोबरी करतील. जाणून घेऊया देशातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद …
 नरेंद्र मोदी इंदिरा गांधींच्‍या ‘त्‍या’ विक्रमाशी बरोबरी करणार का ?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे.  नरेंद्र मोदी आज ( दि. ९ जून) सायंकाळी पंतप्रधानपदी शपथ घेणार आहेत. ते सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी शपथ घेणारे जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या विक्रमाशी ते बरोबरी करतील. जाणून घेऊया देशातील सर्वात जास्त काळ पंतप्रधानपद कोणी भूषवले. Narendra Modi Oath Ceremony
जवाहरलाल नेहरु होते सलग १६ वर्ष ९ महिने १३ दिवस पंतप्रधान
स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरूंनी सलग तीन वेळा देशाची सूत्रे हाती घेतली. पंडित नेहरू 1947 ते 1964 अशी सुमारे १७ वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी १६ वर्षे, ९ महिने, १३ दिवस पंतप्रधानपद भूषवले. २७ मे १९६४रोजी त्यांचे निधन झाले.
इंदिरा गांधींनी चारवेळा भूषवले पंतप्रधानपद
इंदिरा गांधी यांनी चार वेळा पंतप्रधान पद भूषवले. १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर त्‍या प्रथम पंतप्रधान झाल्या. १९६७ मध्‍ये निवडणुकीत विजयानंतर त्‍यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. १९७१ मध्‍ये त्‍यांनी विजयाची परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्‍ये आणीबाणी लादली. त्यामुळे त्‍यांचा १९७६ मध्‍ये  संपुष्टात आलेला पंतप्रधानपदाचा कार्यकाळ १९७७ पर्यंत म्‍हणजे  आणीबाणी संपेपर्यंत सूरुच राहिला. १९८० च्‍या निवडणुकीत त्‍यांनी पुन्‍हा सत्ता काबीज केली. त्‍यांचा अंतिम कार्यकाळ १९८० ते १९८४ असा होता.  इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्‍टोबर १९८४ रोजी त्यांच्या दोन अंगरक्षकांनी  हत्या केली. त्‍यांनी १५ वर्ष ११ महिने आणि २२ दिवस देशाच्या पंतप्रधान राहिल्या. Narendra Modi Oath Ceremony

नरेंद्र मोदी सलग तिसर्‍यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ
नरेंद्र मोदी यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे नेतृत्व केले.  आणि दोन्‍ही निवडणुकांमध्‍ये भाजपला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले.  नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४  रोजी प्रथम पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. आता सलग तिसर्‍यांदा पंतप्रधान पदा भूषवत ते  पंतप्रधान म्हणून तिसरा सर्वात मोठा कार्यकाळ असणारे नेते होणार आहेत.
मनमोहन सिंग यांनी सलग १० वर्ष भूषवले पंतप्रधानपद
देशाचे पहिले शीख पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषवले. काँग्रेस
नेतृत्त्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारचे नेतृत्व त्‍यांनी केले. पंतप्रधान म्‍हणून  मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ 10 वर्षे 5 दिवसांचा होता.
हेही वाचा 

Indira Gandhi : ज्या भारतासाठी तू प्राणाची आहुती दिलीस, तो भारत…. राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत आठवणींना दिला उजाळा (पाहा व्हिडिओ)
‘Emergency : आणीबाणीवर इंदिरा गांधी काय म्हणाल्या होत्या?
पंडित जवाहरलाल नेहरू : सौंदर्यवादी आणि विज्ञाननिष्ठ
Special Parliament Session | मनमोहन सिंग कमी बोलायचे आणि काम जास्त करायचे : अधीर रंजन चौधरी