नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष उपस्थित राहणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी आज (दि.) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. Narendra Modi Oath Ceremony ‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली …

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला कॉंग्रेस अध्यक्ष उपस्थित राहणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नरेंद्र मोदी आज (दि.) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. Narendra Modi Oath Ceremony
‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होईल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी व शहा यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. असे एका निवेदनात कॉंग्रेसने म्हटलं आहे.
पहिल्या टप्प्यात 36 मंत्री शपथ घेणार?
एकूण 36 मंत्री शपथ घेतील, असे सांगण्यात येते. तेलुगू देसम आणि जदयुमधून प्रत्येकी 2 आणि शिवसेनेचा एक कॅबिनेट मंत्री त्यात असेल. याशिवाय राष्ट्रवादी (अजित पवार), लोजप आणि जेडीएसच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्रीही यावेळी शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
राजधानी हायअलर्टवर
राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार असल्याने सुरक्षेसाठी निमलष्करी दलाच्या 5 कंपन्या तैनात करण्यात येतील. शिवाय, उंच इमारतींवर एनएसजी कमांडो, ड्रोन आणि स्नायपर सज्ज असतील. संपूर्ण राजधानी हायअलर्टवर असेल. परदेशी पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारीही गुप्तचर यंत्रणांवर आहे. विशिष्ट मार्गांवर पास असेल त्यांनाच प्रवेश दिला जाईल. Narendra Modi Oath Ceremony
जमावबंदी, नो फ्लाईंग झोन
संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आला आहे. 9 ते 10 जूनदरम्यान पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँग ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्टवर संपूर्ण दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या देशातील नेते उपस्थित राहणार? 
या शपथविधीला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’,  भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

#WATCH | Delhi: NDA leaders attended the tea meeting at 7 LKM, the residence of PM-designate Narendra Modi.
PM-Designate Modi will take the Prime Minister’s oath for the third consecutive term today at 7.15 pm. pic.twitter.com/6RWS8xZBxD
— ANI (@ANI) June 9, 2024

हेही वाचा 

PM Modi Oath Ceremony : गडकरी, पासवान यांना शपथविधीसाठी फोन, टीडीपीचे ‘हे’ नेते होणार मंत्री
शपथविधी समारंभाचे निमंत्रण विरोधकांना नाही : जयराम रमेश
Narendr Modi oath ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; जाणून घ्या वेळ

Go to Source