बेळगाव : बेळगुंदीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळले; एकजण ठार

बेळगाव : बेळगुंदीजवळ धावत्या दुचाकीवर झाड कोसळले; एकजण ठार

बेळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : धावत्या दुचाकीवर झाड कोसळून एक तरुण जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेले दोघेजण जखमी झाले. रविवारी (दि.९) सकाळी दहाच्या सुमारास कर्ले-बेळगुंदी रस्त्यावरील बेळगुंदी स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. सोमनाथ रवळू मुचंडीकर (वय २०, रा. कर्ले) असे मृत तरूणाचे नाव आहे.
सोमनाथ व त्याचे दोघे मित्र कर्लेहून कामानिमित्त बेळगुंदीला जात होते. बेळगुंदी येथील स्मशानभूमीजवळ दोन्ही बाजूला आकाशीची भरपूर झाडे आहेत. यातील एक झाड दुचाकी चालवत असलेल्या सोमनाथच्या अंगावर कोसळले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. पाठीमागे बसलेल्या अन्य दोघांनाही जबर मार लागला आहे. दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा : 

केज – कळंब रोडवर कारचा अपघात
सिंधुदुर्गात मान्सून जोरधार; बळीराजा सुखावला
कोकण रेल्वेचे उद्यापासून पावसाळी वेळापत्रक