गडकरी, पासवान यांना शपथविधीसाठी फोन, TDPचे ‘हे’ नेते होणार मंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : PM Modi Oath Ceremony : ‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी व शहा यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील …

गडकरी, पासवान यांना शपथविधीसाठी फोन, TDPचे ‘हे’ नेते होणार मंत्री

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : PM Modi Oath Ceremony : ‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी व शहा यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही. नितीन गडकरी, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेते रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळाची शपथ घ्यायची आहे, असे फोनवरून सांगण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीआरने बिहारमधील पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागा जिंकल्या होत्या. चिराग स्वतः हाजीपूरमधून निवडणूक जिंकले आहेत. नागपुरातून निवडणूक जिंकून नितीन गडकरी पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत. गडकरी हे मोदी सरकारमध्ये सलग दोन वेळा मंत्री राहिले आहेत. जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे सदस्य आहेत.
अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (सोनेलाल) ने दोन जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी अनुप्रिया पटेल यांना फक्त त्यांची जागा जिंकता आली. जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) एनडीएकडून फक्त एक जागा मिळाली होती आणि त्यांनी स्वतः या जागेवरून (गया) निवडणूक लढवली. ते विजयी होऊन संसदेत पोहोचले. तर जयंत चौधरी यांचा पक्षाने दोन्ही जागांवर विजयी मिळवला आहे. जयंत चौधरी हे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत.
टीडीपीच्या 2 खासदारांना फोन
टीडीपीकडून चंद्रशेखर पन्नासमी आणि राममोहन नायडू मंत्री म्हणून शपथ घेतील. आज शपथविधीसाठी दोघांना राष्ट्रपती भवनातून फोन आले आहेत.