D-Mart चे राधाकिशन दमानी सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी

पुढारी ऑनलाईन : अनुभवी गुंतवणूकदार आणि रिटेल चेन D-Mart चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी मिलेनिया २०२३ च्या टॉप २०० सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल २.३८ लाख कोटी एवढे आहे. त्यानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांचा क्रमांक लागतो. बिन्नी आणि सचिन बन्सल यांनी दुसरे … The post D-Mart चे राधाकिशन दमानी सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी appeared first on पुढारी.
#image_title

D-Mart चे राधाकिशन दमानी सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी

पुढारी ऑनलाईन : अनुभवी गुंतवणूकदार आणि रिटेल चेन D-Mart चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी मिलेनिया २०२३ च्या टॉप २०० सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल २.३८ लाख कोटी एवढे आहे. त्यानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांचा क्रमांक लागतो. बिन्नी आणि सचिन बन्सल यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. ज्यांच्या कंपनीचे इक्विटी मूल्य १.१९ लाख कोटी आहे, असे आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट हुरुन इंडियाच्या (IDFC FIRST Private Hurun India’s report) आज ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. (Hurun self-made entrepreneurs list)
संबंधित बातम्या 

‘टाटा टेक’च्या ‘आयपीओ’चं बंपर लिस्टिंग! गुंतवणूकदार मालामाल
आयकर : विवाहातील भेटवस्तू करकक्षेत, जाणून घ्या नियम
BSE मार्केट कॅपने ओलांडला ४ ट्रिलियन डॉलरचा टप्पा
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत नवे बदल, जाणून घ्या त्याविषयी

झोमॅटोचे दीपिंदर गोयल ८६,८३५ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह तिसऱ्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी स्विगीचे श्रीहर्ष मॅजेटी आणि नंदन रेड्डी तसेच Dream 11 चे भावित शेठ, हर्ष जैन आहेत.
विशेष म्हणजे यातील टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी आठ स्टार्टअप्स आहेत. २००० नंतर स्थापन झालेल्या भारतातील सर्वात मौल्यवान कंपन्यांमध्ये २०० कंपन्यांमध्ये ४०५ संस्थापक आहेत. या यादीतील सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य ३० लाख कोटी असून ते डेन्मार्कच्या जीडीपी एवढे आहे.
कैवल्य व्होरा सर्वात तरुण उद्योजक
झेप्टोचे २१ वर्षीय कैवल्य व्होरा हे सेल्फ-मेड उद्योजकांमध्ये सर्वात तरुण आहेत. त्यानंतर Bharatpe चे शाश्वत नकरानी (वय २५) आणि जुपीचे २७ वर्षीय दिलशेर माल्ही हे सर्वात तरुण उद्योजक म्हणून ओळखले जातात. नायकाच्या फाल्गुनी नायर या महिला उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. तर ममाअर्थच्या गझल अलघ आणि Winzo च्या सौम्या सिंह राठोड या यादीतील सर्वात तरुण महिला उद्योजक आहेत. या दोघी ३५ वर्षे वयाच्या आहेत. (Hurun self-made entrepreneurs list)
यशस्वी उद्योजक देशातील २३ शहरांमधील आहेत. यात बंगळूर (१२९), मुंबई (७८), गुरुग्राम आणि नवी दिल्ली (४९) तील उद्योजकांचा समावेश आहे.
The post D-Mart चे राधाकिशन दमानी सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : अनुभवी गुंतवणूकदार आणि रिटेल चेन D-Mart चे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी मिलेनिया २०२३ च्या टॉप २०० सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल २.३८ लाख कोटी एवढे आहे. त्यानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांचा क्रमांक लागतो. बिन्नी आणि सचिन बन्सल यांनी दुसरे …

The post D-Mart चे राधाकिशन दमानी सेल्फ- मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी, पाहा संपूर्ण यादी appeared first on पुढारी.

Go to Source