पुढारी ऑनलाईन डेस्क : राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटाचे फ्रेंचायझी Mardaani 3 चे शूटिंग पुढील वर्षापासून सुरु होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होण्यास सज्ज होण्यास तयार असणार आहे. राणी मुखर्जीने नुकतेच या वृत्ताची पुष्टी केलीय की आगामी चित्रपट ॲक्शन पॅक्ड असणार आहे. यशराज फिल्म्स या फ्रेंचायझीची निर्मिती करत आहेत. राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉय या पोलिस अधिकारीच्या भूमिकेत असेल. (Mardaani 3 )
संबंधित बातम्या –
Animal Advance Booking : ‘ॲनिमल’ चं जबरदस्त बुकिंग; ‘सॅम बहादुर’, ‘जेलर’ ला टाकलं मागे
Koffee With Karan – 8 : शाहरुख-आमिरला नाही म्हटल्याचा काजोलला अजूनही पश्चाताप?
Randeep Hooda Marriage : रणदीप हुड्डा- लिन लैशराम मणिपुरी पद्धतीने विवाहबद्ध (video)
या चित्रपटाला निर्माते आदित्य चोप्राकडूनही परवानगी मिळाली आहे. आता निर्माते चित्रपटातील अन्य कलाकारांविषयी विचार करत आहेत. रिपोर्टनुसार, या चित्रपटाची कथा गोपी पुथरन्स काही महिन्यातच लिहून पूर्ण केली आहे.
रिपोर्ट्सनुसार, राणीला चित्रपटासाठी एक ठोस स्क्रिप्ट हवी होती. त्यानुसार, स्क्रिप्ट तयार करण्यात आली.
मर्दानी २ हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. याची कथा एक सीरियल किलर आणि रेपिस्टला पकडण्याची होती. जुन्या मुलाखतीत राणीमे म्हटले होते की, “मर्दानी आणि मर्दानी २ दोन्ही चित्रपटांमध्ये असे मुद्दे आणण्यात आले, जे सर्वांसमोर आणणे गरजेचे होते.”
The post ‘शिवानी रॉय’ येतेय! राणी मुखर्जीच्या Mardaani 3 चे शूटिंग पुढील वर्षी सुरु appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : राणी मुखर्जीच्या मर्दानी चित्रपटाचे फ्रेंचायझी Mardaani 3 चे शूटिंग पुढील वर्षापासून सुरु होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील वर्षी हा चित्रपट रिलीज होण्यास सज्ज होण्यास तयार असणार आहे. राणी मुखर्जीने नुकतेच या वृत्ताची पुष्टी केलीय की आगामी चित्रपट ॲक्शन पॅक्ड असणार आहे. यशराज फिल्म्स या फ्रेंचायझीची निर्मिती करत आहेत. राणी मुखर्जी शिवानी …
The post ‘शिवानी रॉय’ येतेय! राणी मुखर्जीच्या Mardaani 3 चे शूटिंग पुढील वर्षी सुरु appeared first on पुढारी.