काँग्रेसची उत्तर प्रदेशमध्‍ये ११ पासून ‘धन्यवाद यात्रा’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश राज्‍यात लक्षणीय यश मिळवले आहे. आता या कामगिरीनंतर काँग्रेस राज्‍यात ११ जूनपासून धन्‍यवाद यात्रेचे आयोजन केले आहे. नुकत्‍याच पार पडलेल्‍या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला आहे. राज्‍यात इंडिया आघाडतील समाजवादी पार्टीला ३७ जागा मिळाल्‍या आहेत. या कामगिरीने प्रदेश …
काँग्रेसची उत्तर प्रदेशमध्‍ये ११ पासून ‘धन्यवाद यात्रा’


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश राज्‍यात लक्षणीय यश मिळवले आहे. आता या कामगिरीनंतर काँग्रेस राज्‍यात ११ जूनपासून धन्‍यवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
नुकत्‍याच पार पडलेल्‍या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील ८० जागांपैकी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला आहे. राज्‍यात इंडिया आघाडतील समाजवादी पार्टीला ३७ जागा मिळाल्‍या आहेत. या कामगिरीने प्रदेश काँग्रेसमध्‍ये उत्‍साहाचे वातावरण आहे. आता राज्यातील विधानसभेच्‍या सर्व ४०३ मतदारसंघात ११ ते १५ जून या कालावधीत ‘धन्यवाद यात्रा’ काढण्याची घोषणा केली आहे या यात्रेत पक्षाचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. यात्रेदरम्यान विविध समाजातील व्यक्तींचा संविधानाची प्रत देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
हेही वाचा : 

Maharashtra Politics : ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार; खा. नरेश म्हस्के यांचा दावा
T20 World Cup 2024 : बांगलादेशचा पहिला विजय; श्रीलंकेचा २ गडी राखून पराभव
Sanjay Raut| चंद्राबाबू, नितीश कुमारांना संजय राऊतांचा टाेला, “स्‍वत:ला संविधानाचे पुजारी…”

 

Go to Source