रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : रामोजी फिल्म सिटी आणि ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांचे आज (दि. ८) सकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ५ जून रोजी हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात दाखल …

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : रामोजी फिल्म सिटी आणि ईनाडूचे संस्थापक रामोजी राव यांचे आज (दि. ८) सकाळी वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पहाटे ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उच्च रक्तदाब आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना ५ जून रोजी हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
१६ नोव्हेंबर १९३६ रोजी जन्मलेले रामोजी राव एक भारतीय उद्योगपती, मीडिया उद्योजक आणि चित्रपट निर्माते होते. ते रामोजी समूहाचे प्रमुख होते. त्यांनी जगातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती सुविधा असलेल्या रामोजी फिल्म सिटी आणि चित्रपट निर्मिती कंपनी उषा किरण मूव्हीजची स्थापना केली आहे. तेलगू चित्रपटातील त्यांच्या कामांसाठी त्यांना दक्षिणेकडील चार फिल्मफेअर पुरस्कार, पाच नंदी पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले होते. २०१६ मध्ये पत्रकारिता, साहित्य आणि शिक्षणातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते.

Eenadu & Ramoji Film City founder Ramoji Rao, passed away today morning in Hyderabad, Telangana.
Ramoji Rao died while undergoing treatment at Star Hospital in Hyderabad. He took his last breath at 3:45 am. pic.twitter.com/DJGufYRtMP
— ANI (@ANI) June 8, 2024

Go to Source