पुणे : मुंढव्यात अनधिकृत जाहिरात फलकांचे जाळे

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : मुंढवा येथे पालिकेकडे कोणतेही शुल्क न भरता अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये उत्पन्न बुडत आहे. जाहिरात फलकांचे शुल्क भरा, अशी नोटीस पालिकेने 20 नोव्हेंबर रोजी संबंधितांना दिली आहे. मात्र, त्याला अद्याप कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. पालिकेने मागील आठ महिन्यांपूर्वी होर्डिंग्ज व जाहिरात … The post पुणे : मुंढव्यात अनधिकृत जाहिरात फलकांचे जाळे appeared first on पुढारी.
#image_title

पुणे : मुंढव्यात अनधिकृत जाहिरात फलकांचे जाळे

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : मुंढवा येथे पालिकेकडे कोणतेही शुल्क न भरता अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये उत्पन्न बुडत आहे. जाहिरात फलकांचे शुल्क भरा, अशी नोटीस पालिकेने 20 नोव्हेंबर रोजी संबंधितांना दिली आहे. मात्र, त्याला अद्याप कोणीही प्रतिसाद दिलेला नाही.

पालिकेने मागील आठ महिन्यांपूर्वी होर्डिंग्ज व जाहिरात बोर्डाच्या शुल्कामध्ये तिप्पट वाढ केली आहे. पालिकेकडे जाहिरातीचे एवढे शुल्क भरण्यापेक्षा वेगवेगळ्या शकली लढवून टॅक्स चुकविण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे. एखाद्या ठिकाणी पंधरा जाहिरात बोर्ड लावायचे आणि पालिकेकडे फक्त दहा बोर्डचेच शुल्क भ?ायचे, असाही प्रकार होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
पालिकेच्या नोटिशीला केराची टोपली
हडपसर आकाशचिन्ह विभागाने 20 नोव्हेंबर रोजी मुंढवा येथील सात ठिकाणच्या अनधिकृत जाहिरात फलकांना नोटीस बजावली होती. संबंधित जाहिरात फलकांचे शुल्क सात दिवसांत पालिकेकडे जमा करावे, असे नोटिशीत म्हटले होते. मात्र, अद्याप कोणीही पालिकेकडे शुल्क भरलेले नाही. त्यामुळे पालिकेच्या नोटिशीला केराची टोपली दाखविली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंढवा येथे अनेक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लागले आहेत. यावर ठोस कारवाई होणे आवश्यक आहे. पालिकेने कोणालाही पाठीशी न घालता सरसकट कारवाई करणे आवश्यक आहे.

– शिवाजी पवार, हवेली तालुकाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

अनधिकृत बोर्ड व बॅनर कुठे असतील तर त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. असे प्रकार पुन्हा होणार नाहीत, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल.

– बाळासाहेब ढवळे पाटील,
      सहायक आयुक्त, हडपसर 
                  क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

तलावाला तहान सुटकेची! पसरले जलपर्णीचे साम्राज्य
Cop28 dubai : पीएम मोदी COP 28 शिखर परिषदेत सहभागी होणार
Pune Drugs Case : सुदाम इंगळेला अभिषेक बलकवडेकडुन पैसे

The post पुणे : मुंढव्यात अनधिकृत जाहिरात फलकांचे जाळे appeared first on पुढारी.

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : मुंढवा येथे पालिकेकडे कोणतेही शुल्क न भरता अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पालिकेचे लाखो रुपये उत्पन्न बुडत आहे. जाहिरात फलकांचे शुल्क भरा, अशी नोटीस पालिकेने 20 नोव्हेंबर रोजी संबंधितांना दिली आहे. मात्र, त्याला अद्याप कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. पालिकेने मागील आठ महिन्यांपूर्वी होर्डिंग्ज व जाहिरात …

The post पुणे : मुंढव्यात अनधिकृत जाहिरात फलकांचे जाळे appeared first on पुढारी.

Go to Source