शिवसेना शिंदेंच्या गटनेतेपदी श्रीकांत शिंदे तर प्रतोदपदी श्रीरंग बारणे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या संसदेतील गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांची तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एनडीए सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी …

शिवसेना शिंदेंच्या गटनेतेपदी श्रीकांत शिंदे तर प्रतोदपदी श्रीरंग बारणे

नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या संसदेतील गटनेतेपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांची तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
एनडीए सरकारमध्ये शिवसेना शिंदे गटाला एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मंत्रीपदासाठी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांच्या नावाचीही चर्चा आहे. गटनेतेपदी निवड झाल्यावर सर्वांना सोबत घेऊन एकदिलाने काम करणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.