मनोज जरांगे उपोषणावर ठाम, अंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त

वडीगोद्री (जालना), पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही उद्या (दि. 8), शनिवारपासून आमरण उपोषण करणारच असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. जरांगे म्हणाले की, ‘शनिवारी सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार असून परवानगी दिली अथवा नाकारली तरी उपोषण होणार आहे. आम्हाला …

मनोज जरांगे उपोषणावर ठाम, अंतरवाली सराटीत पोलिसांचा बंदोबस्त

वडीगोद्री (जालना), Bharat Live News Media वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही उद्या (दि. 8), शनिवारपासून आमरण उपोषण करणारच असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
जरांगे म्हणाले की, ‘शनिवारी सकाळी 10 वाजता उपोषणाला सुरुवात होणार असून परवानगी दिली अथवा नाकारली तरी उपोषण होणार आहे. आम्हाला परवानगीची आवश्यकता नाही. हे आंदोलन 29 ऑगस्टपासून सुरू आहे. मध्यंतरी सरकारने आश्वासन दिले. म्हणून आंदोलन स्थगित केले होते. स्थगित केलेल्या आंदोलनाला पुन्हा परवानगीची आवश्यकता नसते. हे सरकार विसरते आहे का?’ असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘आम्ही परवानगी मागणारच नव्हतो मात्र अंबडचे तहसीलदार यांनी स्वतः भेट घेऊन सांगितले की 8 जूनच्या उपोषणाचे निवेदन जिल्हाधिकारी आणि एस. पी. यांना द्या. आता तेच प्रशासनातील लोक परवानगी नाकरत आहेत. म्हणजे सरकारला जाणून-बुजून हे करायचे होते. परवानगी नाकारून अंतरवालीत बसलेल्या समाज बांधवांवर गृहमंत्र्यांना पुन्हा लाठी हल्ला करायचा आहे. माता माऊलींचे डोके फोडण्याचा सरकारचा, गृहमंत्र्यांचा डाव दिसतोय’, असा आरोप जरांगे यांनी केला.
ते पुढे बोलताना म्हणाले की, गृहमंत्री फडवणीसांनी किती हल्ले करायचे ते करा. आमची डोकी फोडायची ती फोडा मात्र आम्ही उपोषणावर ठाम आहोत. उपोषण होणार मराठ्यांच्या मागण्यासाठी हे आंदोलन होणारच. मला अटक केली तरीही मी जेलमध्ये उपोषण करणार. मला उपोषण करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, असा इशारा देत जरांगे-पाटील यांनी ‘सरकार जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करत आहे.आंदोलनाच्या विरोधात निवेदने देत आहेत. तर मराठ्यांना निवेदने देता येत नाहीत का? कुणी कितीही विरोध केला तरी शनिवारपासून आंदोलन सुरू होणार’, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.