मोठी बातमी: देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा तूर्तास लांबणीवर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. यानंतर त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम होते. अखेर आज (दि. ७) दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये असा सल्ला शहा यांनी दिल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
शहा यांनी शिंदे आणि पवार यांच्यासोबत सुमारे अर्धा तास बैठक घेतली. त्यांनी फडणवीस यांनी शहा यांची भेट घेतली. यावेळी तूर्तास राजीनामा देऊ नका. पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर यावर निर्णय घेऊ, तो पर्यंत राज्यात काम सुरूच ठेवा, असा सल्ला शहा यांनी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले जात आहे.