गद्दारांना पुन्हा पक्षात स्थान नको : खासदार नागेश आष्टीकर
नवी दिल्ली; Bharat Live News Media वृत्तसेवा : ज्या लोकांनी गद्दारी केली, त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी व्यक्त केले. लोकसभेत नोंदणी करण्यासाठी आष्टीकर शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाण्यास तयार असल्याच्या चर्चेबद्दल विचारल्यावर गद्दारांना पुन्हा पक्षात घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.