इंडिया आघाडीत फूट! नरेंद्र मोदींची जहरी टीका, म्हणाले; ‘स्वार्थासाठी..’
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Congress vs AAP : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडाही झालेला नाही इंडिया आघाडीमध्ये फाटाफुट झाली आहे. आम आदमी पार्टीने काँग्रेससोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा करत यापुढे दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वतंत्र लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम आदमी पार्टीने (आप) दिल्लीत विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याची घोषणा केली. दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय म्हणाले की, आम आदमी पार्टी इंडिया अलायन्सचा भाग असूनही 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुका एकट्याने लढवेल. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे, इतर कोणत्याही पक्षाशी युती केलेली नाही. दिल्लीत काँग्रेससोबतची युती फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती’, असे स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी यांची जोरदार टीका
भाजपा नेते नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्ष आणि एनडीए नेतेपदी निवड झाली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि सरकारच्या आगामी उद्दिष्टांवर तपशीलवार भाष्य केले. त्यानंतर त्यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडी आणि विशेषतः काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील वाटाघाटींवरही पंतप्रधान मोदींनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘सत्तेच्या लालसेपोटी, स्वत:च्या स्वार्थासाठी आणि निव्वळ फोटो काढण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. हे मी वेळोवेळी सांगत आलोय. निवडणूक निकालानंतर त्यांच्या आघाडीत विघटन निश्चित होते आणि तेच घडत आहे.’ (Congress vs AAP)
एनडीए आणि इंडिया आघाडीमधील फरकाचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, ‘दोघांमध्ये खूप फरक आहे. विरोधकांची आघाडी ही केवळ सत्ता मिळवून त्याचा गैरफायदा घेण्यासाठी आहे. या आघाडीतीक घडक पक्ष एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत राहिले, यापुढेही हेच पहायला मिळणार आजे. त्यांनी फोटो ऑपसाठी आघाडी केली, पण अनेक राज्यात ते आपापसातच लढत राहिले’, असा टोला लगावला. (Congress vs AAP)